हिमायतनगर पोलीसांची दमदार कामगिरी म्हैस चोरास केले अटक.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

चोराकडुन 4,90,000 रु ची मालमत्ता केली हस्तगत

प्रतिनीधी/माधव काईतवाड

हिमायतनगर:- मा.श्री.अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत व माली गुन्ह उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.24.11.2024 रोजी 19.00 ते दि.25.11.2024 रोजी 04.00 रोजीच्या सुमारास फिर्यादी नामे श्री. उत्तमराव धुळबाराव कोळेकर, हि.50 वर्ष, धंदा शेती, रा.ठि. लकडोबा चौक, हिमायतनगर, ता. हिमायतनगर, जि. नांदेड, व साक्षीदार श्री. गोविंद उत्तम ढोणे, हि.35 वर्ष, धंदा शेती, री.ठि. ता. हिमायतनगर, जि. नांदेड यांच्या आखाड्यावर बांधलेल्या प्रत्येकी 30,000/- रु. किंमतीच्या 03 म्हैस एकूण किंमत 90,000/- रु. ह्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याती फिर्यादी यांनी पोलीस ठाणेस तक्रार दिल्याने हिमायतनगर पोलीस ठाणे गु.र.क्र. गु.र.क्र.283/2024 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

नमुद गुन्ह्याचा तपास करीत असताना दि.25.12.2024 रोजी गुप्त बातमीदारांकडून इसम नामे शेख सत्तार शेख आमीर, मु. 29 वर्ष, रा. मुर्तझा कॉलनी, हिमायतनगर, जि. नांदेड हा म्हैस चोरीच्या गुन्ह्यात सक्रीय असल्याची माहिती मिळाली. यावरून गुप्त बातमीदारकडून नमुद आरोपीच्या सर्व संभाव्य ठाव ठिकाणांबाबत आरोपीताचा माग काढीत अथक परिश्रम घेऊन नमुद आरोपी हा नई आबादी, हिमायतनगर येथे मिळून आल्याने त्याचेकडे कौशल्यपूर्वक सखोल तपास केला असता त्याने नमूद गुन्हा हा 02 ABCD विधीसंघर्ष ग्रस्त बालकाच्या मदतीने केल्याचे गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीतास दि.25.12.2024 रोजी अटक करण्यात आली.

     अटक आरोपीताकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने नमुद गुन्ह्यातील चोरी केलेल्या 03 म्हैस नमुद 02 विधीसंघर्ष ग्रस्त बालकाच्या मदतीने कारंजा, वाशीम या ठिकाणी आठवडे बाजारात 90,000/- रु. किमतीस विक्री केल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने सदरची 90,000/- रु. रक्कम व गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.MH-26-BB-0332, कि.अं.4,00,000/- रु. अशी एकूण 4,90,000/- रु.ची मालमत्ता हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.हि कामगीरी श्री. अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड श्री. खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर श्री. सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड

श्रीमती. शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकरयांचे मार्गदर्शनाखालीश्री. अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे.सपोउपनि कोमल कागणे, पोहवा/1272, श्याम नागरगोजे,यांनी पार पाडली

Share This Article
error: Content is protected !!