प्रमुख अतिथी म्हणून गोल्ला -गोलेवार समाजाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष मा. भुमन्नाजी आक्कमवाड साहेब.
नायगाव तालुका प्रतिनिधी/
नायगाव – नायगाव तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मौजे बरबडा येथे यशस्वी जीवन कसे जगावे? या विषयावर अहिल्यानगर येथील प्रसिध्द साहित्यिक विठ्ठल बरसमवाड यांचे दिं.29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. हनुमान मंदिर बरबडा येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सदाशिवराव धर्माधिकारी साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून गोल्ला -गोलेवार समाजाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष मा. भुमन्नाजी आक्कमवाड उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी निवृत्त गट विस्तार अधिकारी प्रभाकर फांजेवाड मा.बालाजी शनेवाड,प्राचार्य सुदर्शनराव धर्माधिकारी, डॉ.देविदासराव बडूरे, डॉ.गंगाधर इंद्रवाड, मा. विठ्ठल आलेवार, सदाशिव पचलिंग,पत्रकार बी.आय.बडूरे यांची प्रमुख उपस्थिती होती
आजच्या युवकांना विविध आव्हानांचा सामना करुन यशस्वी जीवन जगायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल बरसमवाड यांनी यशस्वी जीवन कसे जगावे या विषयावर बोलताना आपले विचार मांडले.
ते पुढे म्हणाले की” युवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी”. संयम,वक्तशिरपणा,डोळसश्रध्दा, परिश्रम, सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन,व्यसनमुक्ती ,स्त्री पुरूष समानता,नियमितपणा नीटनेटकेपणा या दशसुत्रीचा अंगिकार करुन युवकांनी जीवनात यशस्वी व्हावे.मोबाईलचा वापर योग्य वेळी करावा. पर्यावरणाची हानी होणार नाही. याची काळजी घ्यावी. पाणी जपून वापरावे.व्यसना पासून दूर रहावे. असा मोलाचा सल्ला युवकांना दिला.

सदरील कार्यक्रमास मा.दत्तात्रय जंगिलवाड, मा. संजय पचलिंग, मा. बालाजी जंगिलवाड, मा. मधुकर घोसलवाड, मा. सतिष शिंगेवाड,मा.रामचंद्र गजेवाड,मा.बाबुराव ढाळजवाड,मा.राजेश भुसलवाड,मा.शंकर अंबुलगे, मा.तिरुपती आलमवाड,मा.संजय लांडगे, मा.अमोल विठ्ठलकर मा. रामकिसन सुवर्णकर,मा.शिवराज कुंभर गावे ,सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई सर्जे,सौ.मुक्तिताई वानखेडे व बहुसंख्य विद्यार्थी, विदयार्थीनी उपस्थित होते. तुम मुझे तंबाखू दो। मै तुम्हे चुना दुगा।। या वाक्यावर एकच हास्यकलोळ झाला. भैरूपैलवान तिकीट काढीत नसतो, या कथेने अंत: करणाचा ठाव घेतला.सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लूटला.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी,जी रुद्रवाड व आभार आदर्श शिक्षक माधव वटपलवाड, यांनी मांडले.