दोन तोंड व आठ पायाचे वगार देणाऱ्या म्हशीचे वाचले प्राण . डॉ.सोनटक्के यांच्या प्रयत्नाला आले यश!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता.प्रतिनिधी / बाबाराव जरगेवाड सिरंजनीकर
हिमायतनगर : दोन तोंड व आठ पायाचे वगार देणाऱ्या म्हशीचे वाचले प्राण.डाँ.सोनटक्के यांच्या प्रयत्नाला मिळाले यश.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी येथील शेतकरी अणिल सुर्यवंशी यांची म्हैश वित आसतांना खुप वेळ जात होता ‌.विण्यास विलंब होत असल्याने म्हैश मृत्यू च्या दारात उभी होती.त्यांच वेळी शेतकरी श्री अणिल सुर्यवंशी यांनी हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ उमेश सोनटक्के यांना संपर्क साधला.त्यावेळी डॉ उमेश सोनटक्के यांनी काही मेडिकल आणि ईतर औषधी व सोबत च्या सहकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष स्थळी भेट दिली.त्यावेळी म्हशीची तब्येत ही हालाकीची होती.डाँ.उमेश सोनटक्के यांनी सूरवातीला तपासणी केली आसता.म्हशीच्या यूनी मार्गातुन दोन शेपुट व दोन पाय बाहेर आल्याचे निदर्शनास आले. आशा परिस्थितीत डॉ.उमेश सोनटक्के यांनी आपल्या सहकार्याच्या सोबतीने पायांना दोर बांधून वासरांना बाहेर ओढले.तेव्हा मात्र बचडा यांना दोन तोंड व आठ पाय असल्याचे निदर्शनास आले आहे.
परंतु आशा परिस्थितीत डॉ उमेश सोनटक्के यांना म्हशीचे जीव वाचवण्यासाठी यश आले आहे ‌.परंतू बचडे हे मरण पावले आहेत ‌
डाँ उमेश सोनटक्के यांच्या या कामाचे कौतुक सर तालुक्यात होतांना दिसत आहे.

Share This Article
error: Content is protected !!