गुन्ह्यातील आरोपी मात्र फरार.आरोपींचा शोधसुरु*
प्रतिनीधी/माधव काईतवाड बोरगडीकर
हिमायतनगर:- तालुक्यासह परीसरातुन जनावरांची चोरी व तस्करीचे प्रमाण वाढलेले पाहवयास मिळत होते.परंतु नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत हिमायतनगर पोलीसांनी दि.25/12/2024 रोजी मुसक्या आवळल्या त्याच पाठोपाठ दि.1/1/2025 रोजी मा.श्री. अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत व माली गुन्ह उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे यांना आदेशीत केले होते.
दि.01/01/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असतांना गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, मिलाप फंक्शन हॉलच्या पाठीमागे मोकळया जागेत, हिमायतनगर या ठिकाणी अवैध रित्या गोवंशाची बोलेरो पिकअप मध्ये वाहतुक होत आहे. सदरची माहीती प्राप्त होताच 08.30 वा.चे सुमारास नमुद ठिकाणी जाऊन पहाणी केली असता इसम नामे शेख जुनेद शेख उस्मान व त्याचा साथीदार (नाव माहीत नाही 22 वर्ष) यांनी संगनमत करून 02 बोलेलरो पिकअप एकूण कि. 13,00,000/- रु. मध्ये 31 गोवंश व 05 म्हशीची पिल्ले (हलगट/वगार) एकूण 2,76,000/- रु. किंमतीच्या गोवंशाची बेकायदेशीर तस्करी करताना त्यास पकडण्यास गेलो असता शेख जुनेद शेख उस्मान, वय 30 वर्ष पळुन गेला व दुसरा साथीदारास (वय अं.22 वर्ष) पकडत असताना शासकीय कामात अडथळा करून पळून गेला म्हणुन नमुद आरोपीविरुध्द
पोलीस ठाणे हिमायतनगर येथे
गु.र.क्र.01/2025, कलम 132,121(1), 3(5), बी.एन.एस 2023 सह कलम 13, 11 (1) (ड) (ई) (फ) प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 प्रमाणे व प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(a),5(b) सह कलम 47(अ), 48,50,56(c) प्राण्यांचे वाहतुक नियम 1978 सह कलम 125 (E) MV Act गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद 36 गोवंश सुरक्षिततेकामी गोशाळेत पाठविण्यात आले आहे. तसेच नमुद 02 बोलेरो हे पंचनाम्यांतर्गत ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणण्यात आले असू आरोपीतांचा शोध चालू आहे.
नमुद गुन्ह्यात एकूण 36 गोवंश (कि.अं.2,76,000/- रु.) व सफेद रंगाचे दोन बोलेरो पिकअप कि.अं. 13,00,000/- रु. अशी एकूण 15,76,000/-रु. ची मालमत्ता हस्तगत केली हि कार्यवाही श्री. अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेडश्री. खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकरश्री. सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड श्रीमती. शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर
यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अमोल भगत, पोलीस निरीक्षक, सह पोहेका 1272 नागरगोजे, पोहेका 2204 पाटील, पोहेका 1966 आवुलवार, पोहेका 895 चौदंते,यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून मा. वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.