धर्माबाद तहसिल चे पुरवठा अधिकारी पंडीत राठोड यांची विभागीय चौकशी करावे – पत्रकार संघटनेची मागणी       

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

राठोड यांची अनेकदा तक्रार करूनही कार्यवाही मात्र गुलदस्त्यात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड :दि.१.जिल्यातील धर्माबाद तालुक्यात गोरगरीब जनतेला शासन मोफत धान्य पुरवठा करीत असले तरी प्रत्यक्षात पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार पंडीत राठोड यांच्या एकाधिकार शाही पणामुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेनासे झाले आहे. 

स्वस्त धान्य वितरण व्यवस्था पारदर्शक राहावी म्हणून सरकारने ई पॉस मशीन मार्फतच राशन वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक जनतेचे धान्य गायब केले जाते. आणि दर दोन महिन्याला एकदा लाभार्थ्यांचा अंगठा घेतला जातो. प्रत्येक महिन्याला शासन धान्य पुरवठा करूनही विलंबाने वाटून मध्येच एक महिना गॅप करून त्या महिन्याचे धान्य गायब केले जाते. तालुक्यात मागील वर्षभरात एकदाही ई पॉस मशीन मार्फत शंभर टक्के धान्य वाटप का झाले नाही आणि हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचारास एक प्रकारे हातभार लावण्यासाठी तर होत नाही का? 

 पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पंडित राठोड धर्माबादला रुजू झाल्यापासून आज पर्यंत स्वस्त धान्य दुकानदार यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे.

 वेळेवर धान्य वाटप न करणे, तक्रार नोंदवही स्वस्त धान्य दुकानात नसणे, लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानात नसणे,धान्य लाभार्थ्यांना किती मिळाले हे नियंत्रण व पावती न देणे, पावती निघत नाही म्हणून धान्य कमी देणे,नसता पुढच्या महिन्यात या,मर्जीतल्या दुकानदाराला दोन दुकाने सलग्न जोडणे,प्रत्येक दुकानासमोर एक मर्जीतीला धान्य खरेदी करणारा व्यापारी बसविणे, धान्य दुकान चालू राहण्याची वेळापत्रक न लावणे,दुकान चालू झाले असता एक ते दोनच दिवस दुकान चालू असणे, योजनेअंतर्गत धान्य वेळेवर येऊन सुद्धा वाटप करण्यास जवळपास 20 ते 25 दिवस विलंब करतात. या पुर्वी 

 नायगाव विधानसभा मतदार संघाचे सन्माननीय आमदार श्री राजेश पवार साहेब यांनी या संदर्भात मागील वर्षी जिल्हाधिकारी साहेबांना पत्र पाठवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शासकीय धान्य गोदामात धाड टाकली पण कारवाई मात्र का करण्यात आली नाही.तालुक्यांतील गोर गरीबांचे धान्य वाटप न करता त्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करणा­या दुकान चालकांचे परवाने रद्द करण्यात यावेत. तसेच या प्रकारास जबाबदार असलेले पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार पंडीत राठोड यांना निलंबित करण्यात यावे.अशी मागणी धर्माबाद पत्रकार संघटना तालुकाध्यक्ष बाबुराव पाटील आलुरकर,व धर्माबाद तालुका बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष लखमावाड पोतन्ना,बाबुराव दत्ता गोणारकर, यांनी तहसीलदार सुरेखा स्वामी मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Share This Article
error: Content is protected !!