केंद्रातील मोदी सरकारला नितीशकुमार धक्का देणार? एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत.

त्यानंतर दिल्ली, बिहारसह इतरही राज्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. असे असताना आता केंद्रात सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (JDU) राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही असा संशय जनता दल युनायटेडच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे नितीश कुमार विधानसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत परत येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, बिहारच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील. रालोआचे नेतृत्व नितीश कुमारच करतील असे सांगितले आहे. या सर्व चर्चा सुरू असताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासाठी राजदचे दरवाजे बंद असल्याचे वक्तव्य केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!