लाडक्या बहिणींची पडताळणी होणार, राज्य सरकाराचा मोठा निर्णय, ‘काही महिलांना दोन वेळा…’

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

लाडक्या बहिणींची पडताळणी होणार, राज्य सरकाराचा मोठा निर्णय, ‘काही महिलांना दोन वेळा…’

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे  यांनी जाहीर केलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “लाडकी बहिण योजनेच्या मूळ जीआरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही. स्थानिक प्रधानाकडून तक्रारी आल्या आहेत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांची पडताळणी होणार आहे. सरसकट पडताळणी होणार नाही. ज्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत त्यांची पडताळणी होणार आहे. काही तक्रारी आम्हाला लाभार्थी महिलांकडून प्राप्त झाल्या आहेत,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!