उमरी तालुक्यातील करकाळा गावातून राष्ट्रवादीच्या बूथ कमिटी शाखा उभारणीला प्रारंभ 

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे

उमरी- राज्याचे नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना अजित दादा पवार यांच्या जुलै मध्ये होणाऱ्या वाढ दिवसाचे औचित्य साधून उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला या बूथ कमीट्या व शाखा स्थापनेचा शुभारंभ आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारी रोजी उमरी तालुक्यातील करकाळा ह्या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांचे शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना राज्यात ना अजित दादा च्या नेतृत्वाखाली आपण पक्ष बाधनीच काम हाती घेतलं त्या वेळी नव्याने पक्ष बांधणी करण्याचं काम आव्हानात्मक होत गेल्या वर्षभरात सर्व स्तरावरील पक्ष बांधणी पूर्ण झाली जनतेने ही आमच्या कामाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील सर्व विधानसभेचे उमेदवार निवडून दिले पुढील काळा त विकासाची कामे कशा पद्धतीने करता येतील या कडे आपण लक्ष देऊ गावकऱ्यांनी सभागृहाची मागणी केली ती निश्चित पने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असेही आश्वासन या वेळी धर्म अधिकारी यांनी गावकऱ्यांना दिले या प्रसंगी ना अजित दादा पवार यांच्या जुलै महिन्यात होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरी तालुक्यातून 66 शाखा व बूथ कमिट्या बांधणी करण्याचा संकल्प तालुकाध्यक्ष व तालुक्याचे सर्व पदाधिकार्याच्या माध्यमातून आपण करीत आहोत या माध्यमातून पक्ष संघटन करणे महायुती शासनाची कामे जनतेपर्यंत नेण्याचाही प्रयत्न करू तसेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही सर्व तालुकाध्यक्ष व बूथ कमिट्याच्या अध्यक्षांचा पाठपुरावा करून जिल्ह्यातही शखा उभारणीचे काम जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करू असा निर्धार प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस तथा बूथ कमीटी चे जिल्हाध्यक्ष डॉ विक्रम देशमुख यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष करकाळा या गावाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाअध्यक्ष दिलीपराव जी धर्माधिकारी यांचे हस्ते hi राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलकाचे अनावरण फीत कापून व श्रीफळ फोडून शाखेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी रां कॉ पार्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम बूथ कमिटी चे तालुकाध्यक्ष अविनाश पवळे श्रीनिवास अनंतवार जिल्हा उपाध्यक्ष बालाजी अनेराये जिल्हा संघटक काँब्राजी गुंठे बूथ कमिटीचे तालुका उपाध्यक्ष संतोष गुंठे रा कॉ तालुका उपाध्यक्ष रावसाहेब वडजे गणेश पाटील जाधव सहकार सेल चे जिल्हा अध्यक्ष मुजमिल बेग मोगल युवक उपाध्यक्ष बालाजी पवार आणि संतोष वाघमारे तळेगाव रा कॉ पक्षाचे अध्यक्ष राम जगेवाड वो बी सी सेल चे उपाध्यक्ष दांडेवाड वो बी सी चे तालुकाध्यक्ष हवगीरराव निमटेककर सामाजिक न्याय उपाध्यक्ष रमेश हैबते तालुकाध्यक्ष गायकवाड इ पदाधिका र्यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!