हुजपा महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण: 2020 कार्यशाळेचे आयोजन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

हिमालयाच्या तगजरगेवाड बाबाराव
हिमायतनगर-हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांहसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण: 2020 अंमलबजावणीच्या अनुषंगाने एक दिवशीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन दि . ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते.

या एक दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रोफेसर व अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील डॉ. डी. एम. खंदारे हे लाभले होते. तसेच महाविद्यालयाचे नोडल अधिकारी प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

_*कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ व वीर हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंचावरिल मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे यांच्या प्रास्ताविकेनंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रो. डॉ. डी.एम. कंधारे यांनी मार्गदर्शन करताना चार वर्षाची पदवी आणि पारंपारिक पदवी यातील फरक सांगितला. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेमध्ये प्रवेश घेता येतो हे पटवून दिले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आजच्या प्राध्यापकांना व शिक्षकांना अनेक विषयाचे अध्यापन करावे लागणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वांसाठी उपयुक्त असून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसार करावा. असे ते म्हणाले. डॉ. खंदारे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून पी.पी.टी. च्या आधारे नवीन शैक्षणिक धोरण 2020 पटवून दिले. आणि कार्यशाळाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी नवीन शैक्षणिक धोरण: 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. आणि यामध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापकांसह समाजाचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

*या कार्यशाळेचे सूत्रसंचलन रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार इतिहास विभागाचे प्रमुख डॉ वसंत कदम यांनी मानले. सदरील कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!