संपादक/अभिषेक बकेवाड
नांदेड – गोल्ला गोलेवार समाजाचे कैवारी, समाजाचे थोर समाज सेवक स्व. बाबारावजी करेवाड कोल्हारीकर ज्यांनी गोलेवार समाजास एन. टी. ब चे आरक्षण मिळवून दिले.
बाबारावजी करेवाड यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील पत्रकार कॉलनी येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गोल्ला गोलेवार यादव समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब बोलताना म्हणाले की स्व.बाबारावजी करेवाड यांचे योगदान समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांनी संपुर्ण जीवन समाजासाठी साठी व सामाजिक कार्यासाठी खर्च केले, समाजासाठी त्यांनी जीवन भर संघर्ष केला.आज आपल्या मुलांना शाळेत स्कॉलरशिप,नवोदय,नोकरी,मिळत आहे समाजात चांगले स्थान मिळाले आहे महाराष्ट्रात. आपलं समजा बांधव सर्वोच्च पदावर काम करत असल्याचे आपल्याला पहावयास मिळते शिक्षणापासून आज कोणालाही वंचित राहावे लागत नाही हे बाबाराव करेवाड यांच्या मुळे झाले आहे प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड यांनी सांगितले आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्ष श्री भुमन्नाजी आक्केमवाड भोसीकर, प्रदेश कोष्याध्यक्ष श्री पी. पी. फांजेवाड, जि. कार्याध्यक्ष श्री रमेशराव रामपूरवार, जि. कोशाध्यक्ष तुकारामजी कैलवाड, जिल्हा मार्गदर्शक श्री बालाजीराव शेणेवाड आदी उपस्थित होते.