महाराणा प्रतापसिंह चौकातील सुशोभीकरण रखडले,राजपूत समाजाचा आंदोलनाचा इशारा

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – हिंदू कुलभूषण वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह चौक,नांदेड येथील पुतळा परिसरातील चबुतऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.बांधकाम विभागाने अधिकृत कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काम रखडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित काम तात्काळ सुरू करावे आणि वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी श्री क्षत्रिय राजपूत युवा संघ नांदेडने नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की,वेळेत काम पूर्ण न झाल्यास समस्त राजपूत समाज आणि श्री क्षत्रिय राजपूत युवा संघाच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल.या इशाऱ्यामुळे प्रशासनाला त्वरीत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

३१ डिसेंबर २०२४ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनाने सुशोभीकरणाच्या कामात गती येईल का,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
error: Content is protected !!