वर्षभरापूर्वी लग्न, शिक्षक दाम्पत्यानं कालव्यात उडी मारून संपवलं जीवन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

पुणे – नारायणगाव  कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या शिक्षकी पेशातील उच्च विद्या विभूषित चिराग चंद्रशेखर शेळके( वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा.पल्लवी (वय 24) या शिक्षक दांपत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.

   चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते.ते विद्यार्थी प्रिय शिक्षक,नाट्य लेखक, कवी सुद्धा होते. त्यांनी लेखन केलेल्या नाटकाचा शालेय जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. ते अतिशय संवेदनशील, शिस्तप्रिय शिक्षक असल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिली. त्यांच्या पत्नी प्रा.पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता.ते वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील अभंग वस्तीत राहत होते. चिराग, त्याची आई व पत्नी असे त्रिकोणी कुटुंब होते. 

बुधवारी (ता. 1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व प्रा.पल्लवी हे दुचाकी वरून येथील वारूळवाडी – ठाकरवाडी रस्त्यावरील डिंभे डावा कालव्यावरील पुलावर आले होते. त्यांनी दुचाकी पुलावर उभी केली.या वेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणातच ते दिसेनासे झाले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!