राज्य रस्ता सुरक्षा अभियानास नांदेड जिल्हयात सुरुवात..
नांदेड जिल्हा प्रतिनिधी अशोक वाघमारे.
नांदेड़ : निष्णात फलंदाज सचिन तेंडुलकर फिरकी गोलंदाजीवरही हेल्मेट घालून का खेळतो ? याचे उत्तर ज्याला कळले त्याला रस्तासुरक्षेचे मर्म कळले.त्यामुळे रस्त्यावर अतिआत्मविश्वास न दाखवणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, हेल्मेट लावणे, सीट बेल्ट लावणे, मोबाईल न वापरणे,फुटपाथवर पायी चालताना कायम रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहनांकडे तोंड करून चालणे, महत्त्वाचे ठरते. असे केल्यास प्रत्येक अपघात टाळल्या जाऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.
१ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ राबविण्यात येणार असून, त्याकरिता ‘पर्वा ‘ अर्थात इंग्रजी मधील केअर ही थीम घोषीत करण्यात आली आहे. सदर अभियानाचे उद्घाटन ०३ जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून.अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, डॉ. महेश कुमार डोईफोडे, आयुक्त, नांदेड-वाघाळा मनपा, श्रीमती दलजितकौर जज, सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, .बि.सी.पांढरे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड इतर शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात संदिप निमसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का), नांदेड यांनी रस्ता सुरक्षा अभियाना मागचा उद्देश व विभागाची भूमिका मांडली. विभागातर्फे राबविण्यात येणा-या अंमलबजावणी (Enforsment) मुळे व भविष्यातील तंत्रज्ञानाने अपघात कमी करण्याबाबत तसेच सदर अभियान अंतर्गत पूर्ण महिनाभर परिवहन विभाग विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.