तब्बल १९ वर्षानी लागला निकाल सी.बी.आय.ला धक्का
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :6 एप्रिल 2006 रोजी नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीसस्टेशनं अंतर्गत असणाऱ्या पाटबंधारे नगर इथ राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा ब्लास्ट झाला होता.या प्रकरणी 13 जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा आता तब्बल 19 वर्षांनी निकाल लागला असून सर्व 13 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नांदेड न्यायालयाच्या या निर्णयाने सीबीआयला मोठा दणका दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर इथ राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा ब्लास्ट झाला होता. यात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते.हा ब्लास्ट बॉम्बचा होता असा आरोप करत हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग करण्यात आला. या प्रकरणात एकूण 13 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खटला दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरुवातील नांदेड पोलीस त्यानंतर एटीएस त्यानंतर सीबीआय ने केला. यातील काही आरोपींवर जालना,परभणी आणि मालेगाव इथल्या स्फोट प्रकरणातही आरोपी करण्यात आले होते.19 वर्षात या खटल्यात एकूण 49 साक्षीदार तपासण्यात आले.अखेर आज नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे…