नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि. ४.जिल्ह्यातील धर्माबाद तालुका हा नांदेड जिल्ह्यातील औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला असुन तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सिमेलगतच आहेत धर्माबाद बसस्थानक येथे एस.टी.चे. डेपो त्वरित मंजूर करून प्रवासाकरता व एस.टी.चे सुद्धा उत्पन्न वाढणे करिता डेपो त्वरित मंजूर करावे अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार प्रा.रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण, आमदार तथा हळद संशोधन केंद्रप्रमुख हेमंत पाटील साहेब नांदेड, विभाग नियंत्रण एस.टी.विभाग नांदेड यांच्याकडे विविध मागण्या संदर्भात निवेदनाद्वारे ज्येष्ठ नेते बाभळी बंधारा कृती समिति अध्यक्ष नागोराव आनंदराव पाटील जाधव रोशनगावकर यांनी मागणी केली आहे.
1) धर्माबाद येथुन नांदेडला जाण्यास 8 मार्ग आहेत2) धर्माबाद येथुन तेलंगणातील निजामाबाद-हैद्राबाद, बासर-अदिलाबाद तसेच कर्नाटकात बिदर जाण्यास 8 ते 10 मार्ग आहेत.3) धर्माबाद येथे तेलंगणाचे म्हैसा व बोधन येथून 39 बस फे-या होतात.4) धर्माबाद येथुन पुर्वी,माहुर,चंद्रपुर,औराद,बिदर,गंगाखेड, लातुर,औसा,पंढरपुर (सोलापुर मार्गे व बार्शी कुंडलवाडी मार्गे) अशा बसेस होत्या ज्या आज बंद आहेत.5) धर्माबाद डेपो झाल्यास धर्माबाद नागुपर, धर्माबाद-शेंगाव, धर्माबाद-गाणगापुर, धर्माबाद-अंबाजोगाई- बोड इ. मार्गावर लांब पल्याच्या बसेस सुरु होतील6) तेलंगणा जाण्यासधर्माबाद-अदिलाबाद-चंद्रपुर,धर्माबाद-बासर-निजामबाद-हैद्राबाद बस चालवता येईल.7) कर्नाटकात जाण्यास धर्माबाद-देगलुर-बिदर, धर्माबाद-लातुर-ऊमरगा-गाणगापुर बस चालवता येईल.
8) धर्माबाद येथुन 8 मार्गाने नांदेडला जाण्यास 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्चुन चांगले रस्ते झालेत पण बस
काही मार्गावर अजुनही सुरु होऊ शकल्या नाहीत त्या सुरु करावे 9) धर्माबाद येथुन कंधार-मुखेड-लोहा, देगलुर-उमरी-मुदखेड-भोकर-अर्धापुर,हदगाव-हिमायतनगर-माहुर- किनवट तालुक्यास एस.टी. च्या सेवेने जोडता येईल.10) धर्माबाद येथुनउमरी-भोकर-हदगाव-उमरखेड मार्गेमाहुर-यवतमाळ-वर्धा-नागपुर जोडता येईल.11) धर्माबाद येथुन नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद-उमरी-मुदखेड याही तालुक्यात एस.टी.चे आगार (डेपो) नाही तरी धर्माबादहुन या 4 ही तालुक्यातील रस्त्याने एस.टी. चालु करुन प्रवाशांची योग्य ती सेवा देता येईल व एस.टी.चे उत्पन्नही वाढेल.
12) यापुर्वी नांदेड जिल्ह्यात माहुर व धर्माबाद येथे महामंडळाचे एकाच ठरावाने डेपो मंजुर केले होते. माहुर येथे डेपो अस्तित्वात आले आहे.
तथापी धर्माबाद येथील एस्तावीत डेपोचे घोंगडे कुठे अडकले हे प्रवाशांना अजुन न उलगडनारे कोडे आहे.
तरी सर्व बाबीचा गांर्भियाने विचार करुन विविध मागण्या संदर्भामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे मार्गी लावून विविध मागण्या पूर्ण करावे धर्माबाद येथे डेपोस फेरमंजुरी द्यावी व प्रवाशी जनतेची सेवा व्हावी धर्माबाद येथे महाराष्ट्रातील अद्यावत असे बसस्थानक असून महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे 2023 व 2024 चा पुरस्कार प्राप्त झाला आहे आगारा करिता येथे जमीन सुद्धा उपलब्ध आहे तथा विविध मागण्या संदर्भामध्ये निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,खासदार प्रा.रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण, आमदार तथा हळद संशोधन केंद्रप्रमुख हेमंत पाटील नांदेड, विभाग नियंत्रण एस.टी विभाग नांदेड,यांच्याकडे बाभळी बंधारा कृती समिती अध्यक्ष नागोराव आनंदराव पाटील जाधव रोशनगावकर यांनी निवेदनाद्वारे विविध मागण्या संदर्भामध्ये मागणी केली आहे.