पुज्य साने गुरुजी विद्यामंदिर देगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्सहात साजरा…! 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नांदेड – नायगाव पुज्य साने गुरुजी विद्यामंदिर देगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बारीकसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक माधवराव देवाले व प्रमुख पाहुण्या म्हणून इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या छोट्या बालीका कु. हिंदवी मोरे व कु.अंजली हंबर्डे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून श्री लक्ष्मण कोंडावार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बालाजी नागठाणे यांनी केले. शाळेतील जवळपास 12 विद्यार्थी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण केले आहे. त्यानंतर प्रमुख अतिथी श्री लक्ष्मण कोंडावार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. स्त्रीयांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरत त्यांना जीवनात स्वाभिमानाने उभं करून जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई फुले स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी असतील असे सांगत कोंडावार सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री माधवराव देवाले यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील शिक्षक श्री कडलवार सर, श्री शिंदे सर, श्री शहापुरे सर, श्री गंगाधर बेळगे सर,श्रीमती जाधव मॅडम, सौ. मिराताई मोरे व कु.मिनाक्षी चिंचलवाड हे सर्व शिक्षक बंधु आणि भगिनी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!