महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार, जगभरातून येणार तब्बल ४० कोटी भाविक

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

प्रयाग राज : १३ जानेवारी २०२५ रोजीपासून सुरू होणारा महाकुंभमेळा केवळ धार्मिक आयोजनच नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना जगभरात पोहोचवणारा आहे. या कुंभमेळ्यात ४० कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत.

येथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा संगम होतो. ४५ दिवस चालणारा हा कुंभमेळा केवळ आर्थिक, प्रशासकीय दृष्ट्याच महत्त्वपूर्ण नाही तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपराही जगासमोर आणतो.

महा परिवहन

  • ३,००० विशेष ट्रेनच्या १३ हजार फेऱ्या
  • प्रयागराज जंक्शनशिवाय ८ अतिरिक्त स्टेशन तयार.
  • उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या ७ हजारांहून अधिक बस तैनात.
  • २०० एसी, ६८०० साधारण आणि ५५० शटल बस.
  • देशाच्या २३ शहरांतून थेट विमाने.
  • विदेशी पाहुण्यांची २०० पेक्षा अधिक चार्टर्ड विमाने येणार.
  • विमान पार्किंगसाठी इतर विमानांची मदत घेणार.
  • २०१३ चे बजेट – १२१४ कोटी
  • २०१९ चे बजेट – ४२०० कोटी
  • २०२५ चे बजेट – ५४३५ कोटी
  • २०२५ – महाखर्च
  • ७,५०० कोटी – महाबजेट
  • ५४३५.६८ कोटी – (केंद्र सरकारने दिले २१०० कोटी)
  • ——————————–

महासुरक्षा

२७०० सीसीटीव्ही कॅमेरे.१०० पेक्षा अधिक फेस रिकग्निशन कॅमेरे.३८,००० पेक्षा अधिक सुरक्षा जवान तैनात.५६ पोलिस ठाणी २४ तास सुरू राहणार.२ सायबर ठाणी सक्रिय राहणार.जमीन आणि पाण्याखालीही ड्रोन राहणार.एआययुक्त कॅमेरे ठेवणार देखरेख.कुंभ परिसरात नोंदणीसह हातात राहणार बँडबारकोड आणि क्युआर कोडसह असतील सुविधा.महाक्षेत्रफळ ४० चौरस किमीमहातंत्रज्ञान – १२ भाषांमध्ये एआय चॅटबॉट आणि गुगल मॅपिंगमहाकुंभमेळा – ४० कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज.महास्थान – २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला चार कोटी लोक पवित्र स्नानासाठी येणार आहेत.

Share This Article
error: Content is protected !!