महिलांच्या अंधारमय जीवनाला सावित्रीमाईच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रकाश – सरपंच मनीषा पा.तोडे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

 नायगाव – एकेकाळी महिलांच्या जीवनात अमावस्याच्या रात्री सारखा अंधार होता पण सावित्रीबाई फुले जन्माला येऊन ज्ञानदीप पेटविले त्यांच्या ज्ञानदानामुळेच महिलांच्या आयुष्यातला अंधार दूर होत त्यांचे जीवन प्रकाशमय झाले आहे,महिलाचे जीवन चूल आणि मूल एवढेच मर्यादित होते हे बंदिस्त जीवन शिक्षणाची दारे खुले झाल्याने महिलांच्या हातातील पाळण्याची दोरी ऐवजी झेंड्याची दोरी आली मी सरपंच नात्याने झेंडा फडकवण्याची मानकरी ठरते ही किमया फक्त सावित्री मातेची आहे असे प्रतिपादन सरपंच मनीषा पाटील तोडे यांनी केले. मौजे रामतीर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसेवा दल शाखा नायगाव व सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ मनीषा पाटील तोडे व उपसरपंच जयश्री पाटील देगलुरे, सुधाताई पाटील पुयड, मुख्याध्यापक पवळे, शिक्षक पुढारी श्रीराम पाटील, अंगणवाडी सेविका भारतीबाई वाघमारे, जयशीला कांबळे, राठोडताई, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संघटक रामेश्वर गायकवाड, बाजीराव सकटे वजीरगावे यांच्या उपस्थितीत सदर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ.लक्ष्मी गायकवाड, उपाध्यक्ष विजय रानडे, सचिव सौ.अंजना डांगे व सौ.सविता बोयाळ,सौ.लक्ष्मी सूर्यतळ, माधव गायकवाड, नवनाथ सूर्यतळ यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहे.

Share This Article
error: Content is protected !!