नायगांव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव – गांधी नगर नायगांव बाजार येथे परमपूज्य राष्ट्रसंत सद् गुरु डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने दि.०२-०१-२०२५ रोज गुरुवार पासून अखंड शिपनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा सूरुवात झाले आहे. तरी सर्व
सद्भक्तांनी या ग्रंथराज परमहस्य पारायण सोहळ्यास उपस्थित राहून आपले जीवन कृतार्थ करुन घ्यावे असे आवाहन सप्ताह संयोजन समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
दररोज पहाटे ५ ते ६ शिवपाठ, ७ ते ८मारुती अभिषेक, ९ ते ११ ग्रंथराज परमरहस्य सामुहिक पारायण सोहळा, ११ ते १२ प्रवचन आरती, १२ ते २ प्रसाद व विश्रांती ३ ते ५ गाथा भजन, ५ते ६ शिवपाठ, ८.३० ते १०.३० शिवकिर्तन व नंतर शिवजागर कार्यक्रम होणार आहे.
दररोज शिवाचार्य आशिर्वचन दि ०२-०१-२०२५ गुरुवार
प.पू. सद्गुरु डॉ. श्री विरुपाक्ष शिवाचार्यमहाराज मुखेड,यांचे आशिर्वाचन दि.०३-०१-२०२५ शुक्रवारह.भ.प. श्री वांसूदेव महाराज कोलंबीकर सेवानिवृत्त ना.तहसीलदार दि.०४-०१-२०२५ शनिवांर प.पू. आचार्य गुरुराजस्वामी अहमदपूरकर०५-०१-२०२५ रविवार.पू. सद्गुण श्री दिगंबर शिवाचार्यमहाराज वसमतकर०६-०१-२०२५प.पू. सदगुरु श्री सोमलिंग शिवाचार्यमहाराज मिचकुंवा०७-०१-२०२५प.पू. सद्गुरु डॉ. श्री सिध्दमाळ शिवाचार्यमहाराज बेटमोगरेकर ०८-०१-२०२५प.पू. सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्यमहाराज तमलूर०९-०१-२०२५प.पू. सद्गुरु डॉ. श्री विरुपाक्ष
गुरुवारशिवाचार्य महाराज मुखेड,दररोजचे किर्तनकार पहिला दिवस शि.भ.प.श्री महेश महाराज गिरके,शि.भ.प.सौ. भाग्यश्री पाटील (शेरे)शि.भ.प.श्री विकास महाराज धस्वडिकर, शि.भ.प. श्री चंद्रकांत अमलापूरे,शि.भ.प.श्री तानाजी पा थोटवाडीकर ,किर्तन केशरी शि.भ.प.श्री अमोल लॉजगे धनजकर,शि.भ.प.श्री कैलास जामकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.
दि.०८-०१-२०२५ रोज बुधवार हुपारी ३ वा. टाळ आरती कीर्तन शि.भ.प. कु. शिवाणी रामदास वसमते लोहगांव यांचे तर दि.९ रोजी सकाळी ९ ते ११ प्रसादाचे कीर्तन त्र्यंबक स्वामी नांदगावकर यांचे होणार आहे त्या नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.