श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रेतील कुस्त्यांच्या दंगल.खा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते उदघाटन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

माळेगाव देवस्थान अ दर्जाच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रयत्न करणार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

 नांदेड – ५.सहभागी सर्व कुस्ती पटूना पंचानी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावाअश्या सूचना ही त्यांनी दिल्या लोकनेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार श्री क्षेत्र खंडोबारायाच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो ही प्रार्थना केलीआज श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथे दक्षिण भारतातील प्रसिद्ध यात्रेच्या 5 व्या दिवशी परिसरातील कुस्तीपटूंच्या कुस्तीचा दंगल कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा कंधार मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कुस्तीच्या कार्यक्रमात मराठवाड्यातील अनेक नामवंत पाहिलवाणाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या निमित्ताने खा.रवींद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत असताना सर्व कुस्त्या अतिशय काटेकोर पणे नियमांत पार पाडल्या जावेत कुस्तीच्या कार्यक्रमासह माळेगाव येथील सर्वच कार्यक्रम उत्कृष्टपणे कार्यक्रम पार पाडल्या जावे अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी कामगार यांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली उपस्थित सर्व कुस्तीपटूना शुभेच्छा दिल्या पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल स्वागत केले या कुस्तीच्या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर एकनाथ मोरे साहेब,संजय आप्पा बेळगे संजय भोशीकर माळवदे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,श्रीनिवास वाघमारे,महेश देशमुख गणेश सावळे,उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!