स्वप्नांजा टाऊन,सुदर्शननगर,शिवरत्ननगर परिसरात ओपन जिमचे उद्घाटन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील महानगरपालिका हद्दीतील तरोडा (खु.) अंतर्गत सुदर्शननगर परिसरात नांदेड उत्तरचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आ.कल्याणकर यांच्या प्रयत्नातून ओपन जिम उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आ.बालाजी कल्याणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी एकनाथराव कल्याणकर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ओपन जिम उपलब्ध करून देण्यात आले आहे,

यामुळे त्यांना व्यायाम आणि शारीरिक कसरत करण्यासाठी सुविधा निर्माण झाली असल्याचे आ.बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Share This Article
error: Content is protected !!