अनंत श्री.विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री.स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने उमरी येथे भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

अनंत श्री.विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री.स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने उमरी येथे भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन

उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे

उमरी:-अनंत श्री.विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संकल्पनेतून संस्थानाच्या वतीने प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञाचेआयोजन करण्यात केला जाते. स्वरूप संप्रदाय तालुका सेवा समिती उमरी यांच्या वतीने दिनांक 7जानेवारी 2025 रोज रविवार सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महादेव

मंदिर येथे रक्तदान महायज्ञाचेआयोजन करण्यात आले आहे.तर दि.9 जानेवारी रोज गुरुवार सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामीण आरोग्य केंद्र शिंधी ता.उमरी येथे रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक ४ जानेवारी २०२४ ते दिनांक १९ जानेवारी २०२५ या कालावधीत रक्तदान महायज्ञाचे नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या वतीने आयोजित

करण्यात आले आहे. सध्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या म हाराष्ट्रात, सिकलसेल, अनेमिया,हिमोफिलिया, थेलेसेमीआ, ब्लड कॅन्सर, किडनी असे अनेक पेशंटजास्त आढळत आहेत.अशाने रुग्णांना वारंवार रक्ताची अत्यंत

आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना,रक्तबाटल्या देण्याचे आमच्या संप्रदायामार्फत निश्चित केली आहे.रक्तदान जीवनदान,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ

दान असे समजले जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरातील रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने

प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सध्याच्या दैनंदिन जीवनात अपघात रक्ताचे विकार प्रस्तुतीच्या वेळी होणारा रक्तस्त्राव शस्त्रक्रिया यासारख्या दुर्धर प्रसंगी अनेकांना उपचाराची गरज असते अनेकदा अशा प्रसंगी तातडीने रक्ताची देखील आवश्यकता असते तंत्रज्ञान कितीही प्रगत झाला तरीही रक्त कारखान्यांमध्ये तयार होत नसल्याने दुसऱ्या कोणालाही

केलेले रक्तदान हे त्या रुग्णास जीवनदान देणारे अमृत ठरते.

आज काल चालता बोलता मृत्यूच्या

दारात उभा असलेल्या व्यक्तीला

तेथून खेचून आणण्याचे सामर्थ्य

फक्त रक्तामध्ये आहे. कुणीही

कुठेतरी रक्ताच्या अभावी मृत्यूची

शेवटचा झगडा करत आहे अशावेळी त्याला वाचवायला कुणाची सहानुभूती दया करुणा किंवा संपत्ती उपयोगात पडणार नाही.तर माणुसकीच्या भावनेने दान केलेले रक्तदानच उपयोगी पडते. ज्याप्रमाणे मातेच्या ममतेसाठी मित्राच्या प्रेमाच्या

सामाजिक आपुलकीची किंमत होऊ शकत नाही त्याचप्रमाणे रक्ताची पण किंमत होऊ शकत नाही म्हणून प्रत्येक निरोगी सदृढ माणसाने रक्तदान करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. त्याकरिता उमरी तालुक्यातील जनतेनी दिनांक 7जानेवारी 2025 रोज

रविवार सकाळी 8 वाजल्यापासून

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महादेव

मंदिर येथे रक्तदान महायज्ञाचे

आयोजन करण्यात आले आहे.तर दि.9 जानेवारी रोज गुरुवार सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामीण आरोग्य केंद्र शिंधी ता.उमरी येथे रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे सदर,सर्वानी येऊन रक्तदान शिबिर आयोजित सहभाग व्हावे असे आवाहन स्वरूप संप्रदाय उमरी तालुका सेवा समिती यानी केला आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!