नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पण दिन उत्साहात साजरा….! 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगांव  प्रतिनिधी/ अशोक वाघमारे

नायगांव – तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने नरसी येथील आदित्य मंगल कार्यालयात आज सोमवारी दि.६ जानेवारी दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    दर्पण दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने आदित्य मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ११.३० आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, प्रा डॉ दयानंद माने, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार, जिल्हा संघटक पंडीत वाघमारे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण बरगे आदिंची उपस्थिती होती.

  या कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर प्रजावाणीचे उपसंपादक संजय बुडकेवार व अर्धापुर पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती तुकाराम चिंचलवाड यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष हनमंत वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार, भुषण पारळकर, माधव पा चव्हाण, पंडीत वाघमारे, गोविद टोकलवाड, मनोहर मोरे, ढगे पाटील, हनमंत चंदनकर, मारोती सुर्यवंशी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तर माजी जिल्हा अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर यांनी शेवटी अध्यक्षीय समारोप केला.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष सय्यद जाफर, दिलीप वाघमारे, तालुकाउपाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार, कैलास तेलंग, शेख आरीफ, अंकुश देगांवकर, अशोक पा जाधव, शेख सत्तार इनामदार, बालाजी हाणमंते,, साहेबराव धसाडे, प्रकाश महीपाळे, माधव बैलकवाड, किरण वाघमारे, सय्यद अजीम, रामकृष्ण मोरे, यशवंत मोरे, ज्ञानेश्वर तोडे, शेषेराव बेलकर, अनिल कांबळे, अशोक वाघमारे, हाणमंत चंदणकर, शिवाजी पांचाळ, शाम गायकवाड, आनंद डाकोरे, देविदास सुर्यवंशी, सहदेव तुरटवाड, विरेंद्र डोंगरे, अशोक वाघमारे, गंगाधर कांबळे, किरण शिंदे, तानाजी शेळगांवकर, गणेश कंदुर्के, दीपक गजभारे घुंगराळेकर सिद्धार्थ गजभारे धम्मदीप भद्रे प्रदीप जोंधळे यांच्यासह प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस रघुनाथ सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार शेषेराव कंधारे यांनी आभार मानले.

Share This Article
error: Content is protected !!