पुण्याला  आणखी ४ वंदे भारत मिळणार ;पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण ६ वंदे भारत एक्स्प्रेस धावणार.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

पुणे – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून आता ४ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. सध्या पुण्यातून २ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. येत्या काही दिवसांत पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण ६ वंदे भारत एक्स्प्रेस येणार आहेत.

प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी ४ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

    २८ डिसेंबर २००४ रोजी रेल्वे प्रशासनाने पुण्याहून ४ नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. या घोषणेनंतर पुण्यातील एकूण वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या ६ होईल. या नव्या ४ वंदे भारत एक्स्प्रेसमुळे आणखी ४ नवी शहरं पुण्याच्या जवळ येणार आहेत. पुणेकरांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देत कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!