ग्रामपंचायत च्या निधीतून मारलेल्या बोरला पाच वर्ष होऊन देखील अद्याप मिळेल नागरिकांना पाणी….

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

ग्रामपंचायतच्या अजब कारभारावर नागरिकांत असंतोष.

 नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे.

नायगाव – तालुक्यातील मोजे हुस्सा येथे सन 2018 -19 मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विकास निधीतून अंदाजीत 12 ते 13 लाख रुपये खर्च करून त्यातून मारण्यात आलेला बोर व पाईपलाईन करण्यात आली होती ते काम तत्कालीन सरपंच, उपसरपंच, व ग्रामसेवक यांच्या संगणमताने झाले असून शासनाने दिलेल्या नियोजित जागेवर मारण्याऐवजी तत्कालीन उपसरपंच असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या खाजगी शेत जमिनीमध्ये मारण्यात आलेला आहे.

       सदर बोरवेल्सला एकूण चार इंची पाणी असून त्यावर किमान अर्धा गावाला पाणी पुरवठा होईल इतकी क्षमता असलेल्या बोरवेलचा पूर्णता गैरवापर करून गेल्या पाच वर्षापासून शेत जमिनी भिजवण्याकरिता वापर होत आहे. एकूणच गावांमध्ये पाणीटंचाई असताना विशेता मागासवर्गीय समाजात पाण्याची तीव्र टंचाई असून ग्रामपंचायत च्या बोरवेलचे पाणी मिळत नसल्याने गावातील नागरिकात असंतोषाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

      शासनाने आज पर्यंत हुस्सा ग्रामपंचायतला कोठावधीचा निधी पुरवला असून देखील गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती चालूच याला कारणीभूत पूर्णतः ग्रामपंचायत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. गावातील नागरिकांच्या हक्काचे पाणी हे शेत जमिनी भिजण्यासाठी पाण्याचा वापर होतो आहे पण गावातील नागरिकांना पाणी मिळत नाही नसल्याने गावातील नागरिकाच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्र शासनाने जल जीवन मशीन “हर घर जल” ची संकल्पना राबविली त्याच अनुषंगाने हुस्सा ग्रामपंचायतला एकूण 1 कोटी 23 हजार रुपये निधी मिळाला आहे.त्यातून केवळ पाईपलांचेच काम झाले असून ती पाईपलेन देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे. जल जीवन मशीनच्या कामाची ना विर, ना टाकी, पण काम पूर्ण झाल्याचे नाम फलक लावून परस्पर बिल लाटण्यात आल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे. म्हणून या बाबतीत संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकात नाराजी दिसून येत आहे. एकंदरीतच गावाला कोट्यावधीचा निधी मिळून देखील गावातील नागरिकांना पाण्यासाठी वन वन व भटकंती करावी लागत आहे पण गावकऱ्यांना पाणी कधी मिळेल अशा अपेक्षा देखील व्यक्त केले आहे.

         ग्रामपंचायत हुस्सा च्या वतीने गावातील नागरिकांना पाणी व्यवस्थित व सुरळीत नळद्वारे मिळावे याकरिता शासनाकडे विविध आराखडे तयार करून कोट्यावधीचा निधी पदरी पाडून घेऊन देखील कामात पारदर्शकता न ठेवता अक्षरशः मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. आणि पंधरावा वित्त आयोगातून सन 2019- 20 मध्ये मागासवर्गीय समाजात पाईपलाईनचे काम झाले ते पाईपलाईन कुठे गेली आहे. व त्याचे नळ कनेक्शन कुठे गेले. या सर्व कामाची चौकशी करण्याची गरज आहे व तत्कालीन सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी.      ग्रामस्थ हुस्सा..

Share This Article
error: Content is protected !!