माळेगाव यात्रेत सोनबा राम अंबिरे धानोरकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनीधी/उद्धव मामडे

नांदेड – येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी तालुका लोहा येथील दीप रोहीदास कागणे या पहेलवानाने जिंकली असून त्यांनी पालम येथील राम तेलंगेची पाठ टेकवली तर दुसरी कुस्ती धानोरा बु.येथील सोनबा रामकिशन अंबिरे यांनी द्वितीय क्रमांक 5000 हजारांच्या कुस्तीचा मानकरी बनला आहे.

माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्याम दरक, एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर, माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, समाज कल्याण अधिकारी आऊलवार, गणेशराव साळवे, डॉ. प्रमोद चिखलीकर, श्रीधर चव्हाण, बंटी पाटील उमरेकर, रोहित पाटील, अनिल बोरगावकर, नरेंद्र गायकवाड, माधव चांदने, केरबा पाटील मन्नान चौधरी, श्रीनिवास मोरे, ग्रामविकास अधिकारी देवकांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

   माळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील पहिलवानांनी हाजेरी लावली. लाखो यात्रेकरूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली.

माळेगाव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मान्यवरांच्या उपस्थितीत निशान घेऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर खंडोबाच्या साक्षीने कुस्तीच्या आखाड्याकडे प्रस्थान करून मान्यवर व यात्रेकरू यांच्या उपस्थितीत कुस्तीची दंगल पार पडली. यावेळी विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, सतिश चोरमले यांच्यासह लोहा पंचायत समितीचे कर्मचारी परिश्रम घेत होते.दुसरी कुस्ती धानोरा बु.येथील सोनबा रामकिशन अंबिरे यांनी द्वितीय क्रमांक 5000 हजारांच्या कुस्तीचा मानकरी बनवल्याबद्दल गावातील भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर पत्रकार उद्धव मामडे दिगांबर जगताप रामकिशन अंबिरे रविकांत डोकळे ज्ञानेश्वर मामडे,साईनाथ जगताप, साईप्रसाद मामडे, संतोष सोगे यांच्यासह अनेक तालुक्यातील बहुसंख्य कुस्ती प्रेमीनी कौतुकाचा वर्षांव केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौसल्य यांनी केले.

Share This Article
error: Content is protected !!