तहसीलदार गायकवाड यांची माफियावर करडी नजर; राहेर येथे वाळू उपसा करणारे साहित्य जप्त.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 नायगाव प्रतिनिधी )अशोक वाघमारे.

नायगाव – तालुक्यातील राहेर येथे दि. 6 जानेवारी रोजी रात्री उशिरा गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेत सोमवारी रात्री उशिरा गोदावरी नदी पात्र गाठून वाळू उपसा करणारी साहित्य जप्त केले आहे.

     कारवाई करण्यासाठी महसूल पथक येत असल्याची माहिती लीक होताच माफीयानी ज्या बोटाच्या साह्याने वाळू करीत होती ती बोट रातोरात अंधारात पळवली तरीही रात्रभर पळवलेल्या बोटीचा शोध तहसीलदार गायकवाड यांनी घेतला परंतु ती बोट हाती लागली नाही.

     नायगाव तालुक्यातील राहेर येथे मागच्या काही दिवसापासून बोटीच्या सहाय्याने वाळू अवैध पणे उपसा करण्यात येत होती महसूल विभागाला या प्रकारची माहिती मिळू नये याची माफियानी काळजी घेत होते पण सदरची माहिती तहसीलदार गायकवाड यांना मिळाली माहिती मिळताच त्यांनी या प्रकाराला पाळत ठेवून दि. 6 जानेवारी रोजी रात्री उशिरा तलाठी डाकेवार,मंडळ अधिकारी पवार, कर्मचारी देवकते,चालक पुरी व अन्य काही कर्मचाऱ्यांना घेऊन राहेर गोदावरी गाठले या वेळी नदीपात्रात वाळूचा उपसा करण्यात येणारे पाईप लोखंडी, टाक्या बांधून असल्याचे दिसून आले पण वाळू उपसा करणारी बोट मात्र दिसली नाही.

           महसूल पथक कारवाई करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच माफी आणि वाळू उपसा करणारी बोट धर्मवाद तालुक्याच्या दिशेने पळवली असल्याचे समजता तहसीलदार गायकवाड यांनी धर्माबाद तहसीलदाराशी संपर्क साधला पण त्यांची यंत्रणा मदतीला आली नाही पण धर्माबाद पोलीस निरीक्षक मात्र आले होते तरी देखील रातोरात पळविली बोटीचा शोध मात्र लागला नाही. पण हिवाळ्याच्या थंडीच्या कडाक्यात रात्री उशिरापर्यंत पहारा करत तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी एक धाडस करून अवैध वाळू उपसा करणारी साहित्य जप्त केले आहे व माफी यांना चांगलाच धक्का देऊन त्यांना लगाम घातले आहे.

        जप्त केलेले साहित्य नेण्यासाठी राहेर परिसरात ट्रॅक्टर मिळाले नसल्याने नायगाव वरून ट्रॅक्टर घ्यावा लागला आणि सर्व साहित्य नायगाव तहसील कार्यालयात नेण्यात आले असून. ही धाडसी कार्यवाही केल्याने तहसीलदार गायकवाड यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!