जनता हायस्कूल नायगाव च्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न…..

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे.

नायगाव – एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कूल नायगाव च्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा बॅच सण 1961- 62- 63 चा दि. 2/1/2025 रोजी कै.बळवंतरावजी चव्हाण सभागृह जनता हायस्कूल नायगाव येथे संपन्न झाला आहे.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी मा.खा. कै. वसंतराव जी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून आणि नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशवराव पा. चव्हाण( ज्येष्ठ संचालक एज्युकेशन सोसायटी नायगाव ), माजी प्राचार्य ह. स.खंडगावकर यांनी कार्यक्रमाचा पुढाकार घेत व व खंडगावकर सर यांच्या आत्मचरित्राच्या प्रती वर्ग मित्रांना भेट देण्यात आली आहे.

      कार्यक्रम दरम्यान प्रमुख उपस्थिती डॉ. पी. एन. जाधव (डिम mgm छ. संभाजीनगर ), आनंदराव पा.चव्हाण, ऍण्ड. धोंडीबा पवार, डॉ.गोपाळराव कदम, बळवंतराव मोरे डॉ सुरेश बेलकर,माधवराव शिंदे, संगमनाथ कवटीकवार, भा. ग. मोरे, कदम सर, किशनराव महाद्वाड, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य केजी सूर्यवंशी, कोषाध्यक्ष गोविंद मेथी, प्रा. पी.डी.जाधव बारुळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

 सदर कार्यक्रमाला माजी विद्यार्थी डॉ पी एन जाधव यांनी अगदी सुवेचन करत उपस्थित त्यांना संबोधित केले व जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देऊन अतिशय मजेशीर प्रकारे मार्गदर्शन करत असताना म्हणाले की एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचे अजूनही संस्कार माझ्या मनात व अंतकरणांमध्ये आहेत एज्युकेशन सोसायटी नायगाव मुळेच मला ही संधी मिळाली आहे. असेही जाधव यांनी म्हणाले आहे. त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थी यांनी आपापली मनोगत व्यक्त करीत स्वतःच्या जीवनातील आठवणी व जनता हायस्कूल चे शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन एज्युकेशन सोसायटी नायगाव शिक्षण संस्थेची परंपरा हे कायम असल्याचे देखील सदर कार्यक्रमांमध्ये सांगण्यात आले आहेत. या संस्थेने नायगाव शहरात शिक्षणाचे बीज पेरले असून शहरातील व ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी यांना मुख्य प्रवाहात आणून मानवी जीवनात अमुलाग्रह बदल घडवणारी संस्था म्हणजे एज्युकेशन सोसायटी नायगाव आहे अशा विविध जीवनातील आठवणी सांगत माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला आहे.

         आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप (ज्येष्ठ संचालक एज्युकेशन सोसायटी नायगाव) केशवराव पा. चव्हाण यांनी केले तर अध्यक्ष समारोमात बोलत असताना चव्हाण यांनी म्हणाले की नायगाव करांच्या पाठीमागे ग्रामीण भागातील विद्यार्थी व शरीर भागातील विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यानेच हमा चव्हाण परिवारांना तुमच्यासाठी काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे तुमच्यासाठीच काम करण्याची संधी भविष्य काळामध्ये सुद्धा मिळेल अशीच अपेक्षा करून जनसेवा ही मानवी मूल्यांचा अविभाज्य भाग आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उप प्राचार्य मोहन चव्हाण यांनी केले आहे. आभार संस्थेचे माजी विद्यार्थी यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!