जिरोना 25/15 चे सी सी रोडचे काम अती बोगस.जे ई कडून गुतेदाराची पाठराखण.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

उमरी प्रतिनिधी उद्धव मामडे

उमरी :-आदर्श गाव जिरोना ता उमरी येथे सन 2023/2024 वर्षात गावाच्या सर्वागीन विकासाठी पंचविस , पंधरा मधुन दहा लाखाचा निधी मंजुर झाला असुन , ह्या कामाचे अंदाज पत्रक बनवताना गावात सा .बा विभाग भोकर चे प्रशासकिय अधिकारी जे ई कधीही आले नाहीत , गुतेदाराच्या सांगण्यावरून जाग्यावर बसुन अंदाज पत्रक बनवण्यात आले आहे , आणि लगेच रात्रीला गिटी टाकून निघुन गेले , आणि पंधरा दिवसानंतर दर्जाहिन डस्ट , दर्जाहीन सिमेन्ट वापरुन घाई गडबडीत दोन दिवसात दहा लाखाचे काम पूर्ण केले आहे , या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर कडून कोणताच जेई उपस्थित नव्हता त्याचे कारण काय? जिरोना येथील हनुमान मंदिरा समोरील काम घाईगडबडीत बोगस झाले.
आहे . हे काम गुतेदार व संबंधीत जे . ई यानी संगनमत करून हे काम

   अति बोगस केले आहे . या कामाची क्वालीटी कट्रोल मार्फत चौकशी करून या मुजोर गुतेदाराचे बील अदा करावे, या सीसी रोडच्या चालु असलेल्या कामावर देखरेखी साठी नियुक्ती असलेले संबंधीत कारकुन उपस्थित का ?राहु शकले नाहीत याचीही चौकशी करावी अशी जिरोना येथील नागरीक मागणी करीत आहेत , यापुढीलकोणतेही काम गावात संबधीत कारकुन गुतेदार आल्याशिवाय काम चालु होणार नाही याची सा बा वि भोकर येथील प्रशासकिय अधिकारी यानी दखल घ्यावी अशी ग्रामस्थाची मागणी आहे

Share This Article
error: Content is protected !!