उमरी प्रतिनिधी उद्धव मामडे
उमरी – एरव्ही सत्ताधारी राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांनी पत्रकार बांधवांना जवळ करून आमच्या बातम्या द्या व आम्हाला प्रसिद्ध करा असे जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो.परंतू ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकारिता दिन असल्या कारणाने सत्ताधारी व अधिकारी यांना विसर पडला.काही मोजक्या लोकांनी बोलून पत्रकार बांधवांचा सन्मान केला गेला हि शोकांतिका आहे.एखाद्या कार्यक्रम असला की बोलवा पत्रकारांना म्हणतात त्यांना करा वेगळा कक्ष त पण त्या कार्यक्रमात लुंग्यासुंग्या कार्यकर्त्यांचे सन्मान करतात परंतु पत्रकार बांधवांचे मात्र सन्मान न करता भाषणातून तेवढेच नाव पुढारी घेतात हि राज्य कृत्याची पत्रकार बद्दल ऐवढी वाईट शोकांतिका व प्रवृत्ती का.? यांचे पाहून प्रशासकिय अधिकारी तोच कित्ता गिरवत आहेत.त्यासाठी पत्रकारिता जागरूकता ठेवत प्रसिद्धीच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिथे चुकले तिथे लेखणीच्या माध्यमातून धारेवर धरले तरच पत्रकारांची वचन निर्माण होते असे यांनी व्यक्त केले.