वैकुंठ एकादशी निमित्ताने बालाजी मंदिरात विविध कार्यक्रमाची आयोजन .

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव ता‌.प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नायगाव- तिरुपती तिरुमला प्रतिरूप समजले जाणाऱ्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशी निमित्ताने शुक्रवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे तिरुपती तिरुमला प्रतिरूप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्र ,सीमेलागत असलेल्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशी निमित्ताने दिनांक 10 जानेवारी रोज शुक्रवारी या दिवशी बालाजीचे दर्शन घेणे म्हणजे विशेष महत्त्व प्राप्त झाल्यामुळे पहाटे महाअभिषेक पूजा , विष्णुसहस्रनाम पाठ महाआरती, महाप्रसाद, आदी सह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आला असून विविध फुलाने विद्युत रोषणाई करून सुशोभित केले असून वैकुंठ एकादशी निमित्त दरवर्षी तिरुपती तिरुमला येथे भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याच धर्तीवर नरसी येथे भगवान बालाजी चे दर्शन सुलभ व्हावे म्हणून चोख व्यवस्था करण्यात आलेले आहे तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान नरसी बालाजी भगवान मंदिर प्रशासनाच्या वतीने केले आहे

Share This Article
error: Content is protected !!