आर्य वैश्य समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नंदकुमार गादेवार यांची बिनविरोध निवड. 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नांदेड – महाराष्ट्र महासभेचे सर्वसाधारण सभा व कार्यकारणी मंडळाची निवड बैठकीत अध्यक्षपदासाठी नंदकुमार गादेवार यांच्या नावाच्या सर्वानुमते चर्चा होऊन बिनविरोध निवड करण्यात आली निवड होताच निवडीचे अतिशय बाजीत पेढे वाटून गुलाल उधळून समाज बांधवांनी स्वागत केले. महाराष्ट्रावर आर्य वैश्य महासभेच्या त्रैवार्षिक निवड दिनांक 5 जानेवारी रविवारी सकाळी दहा वाजता वासवी मंगल कार्यालय नवीन नांदेड येथे महाराष्ट्र कार्यवाही महासभेचे सर्व सदस्य यांच्या उपोषण घेण्यात आली होती.

     यामध्ये सर्वानुमते बिनविरोध महाराष्ट्र प्रदेश आर्यवैश्य महासभा निवडणूकीत अध्यक्ष पदावर मा.नंदकुमार गादेवार कार्याध्यक्ष पदासाठी मा.भानुदास वट्टमवार, महासचीव पदावर मा.गोंवीदराव बिडवई, प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीपराव कंदकुर्ते, प्रदेश संघटक प्रदीप कोकडवार, कोषाध्यक्ष पदावर मा.ज्ञानेश्वर महाजन,बांधकाम समीती सभापदी मा.डाॅ.सूर्यकांत शिरपेवार, बांधकाम समिती सचिव पदी सदानंद मेडेवार यांची बीनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिकार्‍यांचे सर्वत्र आर्य वैश्य समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून फटाके वाजून अतिश बाजी करून पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले

Share This Article
error: Content is protected !!