(कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये संताप.)
नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे.
नायगाव – तालुक्यातील मौजे हुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीतून गावाला एकूण 15 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून पाच कोटी रुपयांच्या अंदाजीतनिधीतून गावातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे व कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
पुनर्वसित गावाखेड्यांना कोट्यावधी रुपयाचा निधी पुरवला असून त्याच्या अनुषंगाने हुस्सा ग्रामपंचायतला देखील 15 कोठीहून अधिक रुपयांचा निधी मिळाला असून देखील कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडून काम मात्र निकृष्ट दर्जाचे होताना दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाला आशीर्वाद नेमकं कोणाचे हा प्रश्न मात्र गावकऱ्यांच्या पुढे उपस्थित होतांना दिसून येत आहे.
हुस्सा पुनर्वसन होऊन 55 ते 60 वर्ष होऊन देखील गावाला अद्यापही पुनर्वसंचा निधी प्राप्त झाला नव्हता मात्र मागील सरकारने बहुतांश गावांना गावाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याकरिता मोठ्या प्रमाणात पुनर्वसनची निधी देण्यात आला आहे. आणि त्याच माध्यमातून हुस्सा ग्रामपंचायतला देखील पंधरा कोटीच्या अधिक निधी गावातील अंतर्गत रस्ते नाली साठी प्राप्त झाला आहे. त्यात पुनर्वसन विकास निधीतून मागील तीन महिन्यापूर्वी एकूण 45 लक्ष रुपयांचा गावातील अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले आहे. आणि उर्वरित अंतर्गत रस्ते आणि नाली बांधकामाचे काम चालू असून सदर कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात येत आहे. सुद्धा निकृष्ट दर्जाच्या कामाला राजाश्रेय कोणाचे आणि कुणाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे काम होतो आहे.
हुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीतून होत असलेले अंतर्गत नाली बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे यामध्ये निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून कामाची सारवा सारव करण्याचा एकंदरीत प्रयत्न होत आहे. आणि काम करणारे कॉन्ट्रॅक्टदार निकृष्ट दर्जाचे काम करत असून या कामांमध्ये संबंधित इंजिनीयर यांचा मोठा आशीर्वाद असल्याने इंजिनिअरचे कामाकडे पूर्णपणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने त्याचाच फायदा घेत कॉन्ट्रॅक्टदार यांनी कामात अनियमितता आणून कामात भ्रष्टाचार करत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते आहे. म्हणून या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्याने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. व कामाचा दर्जा अधिक वाढवून काम मजबूत करून घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे.