महाराष्ट्रात आपल्याला परिवर्तन करायचं आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

जेवढ्या योजना सुरु केल्या त्या सर्व पूर्ण करणार….

शिर्डी – शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडत आहे. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या महाधिवेशनाला हजेरी लावली आहे. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांन मार्गदर्शन केले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रात जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला, त्यासाठी आपल्या सर्वांना मी दंडवत करतो. तुमच्यामुळे (भाजप कार्यकर्ते) हा विजय मिळवता आहे. अमित शाहजी आपल्यासोबत 24 तास सोबत होते. लोकसभेतील पराभवानंतर सर्वजण विचारात होते की आपला पराभव कशामुळे झाला. कार्यकर्ते खचले होते, निराश होते. अशावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रात दौरा केला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवउर्जा भरली. त्यानंतर संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि पक्षाने महाविजय मिळवून दाखवला. त्यामुळे मी सर्वांच्या वतीने अमित शाह यांचे देखील आभार व्यक्त करतो.”

“महाराष्ट्रात आपल्याला परिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. राज्याला दुष्काळमुक्त करण्याकरता नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. दुष्काळ आता भुतकाळ करायचा आहे. महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न सरकारने पाहिलं आहे. महाराष्ट्रातला शेतकरी सुजलाम सुभलाम झाला पाहिजे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Share This Article
error: Content is protected !!