भारतीय पिछडा शोषित संघटनेचे धरणे आंदोलन संपन्न

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड /मंडल सप्ताहची सुरूवात दि. 7 ऑगस्ट पासून करण्यात आली. याच सप्ताहानिमित्त आज दि. 10 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करणे, महाज्योतीमध्ये 21600 विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे. तसेच नांदेडसह प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीसाठी शासनाने घोषित केलेले 36 जिल्ह्यात 72 वसतिगृह सुरू करण्यात यावेत आणि ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी या कर्मचार्‍यांना प्रत्येक स्तरावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे व जिल्हा परिषदेच्या आणि सर्व अनुदानित शाळेमध्ये रिक्त असणार्‍या शिक्षकांच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात. तसेच निवृत्त शिक्षकांना परत नेमणुका न देता त्वरित जिल्हा निवड मंडळाच्या वतीने डी.एड. बी.एड. धारकांच्या नेमणुका करण्यात याव्यात आणि शिक्षणाची हेळसांड थांबवावी, नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करावी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र आरक्षण देऊन त्वरित निवडणुका घ्याव्यात, या व आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात भारतीय पिछडा शोषित संघटनेचे एस.जी. माचनवार, विश्वनाथ कोलमकर, गोल्ला-गोलेवार समाजाचे प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर, पी.पी. बंकलवाड, रामचंद्र येईलवाड, गोविंदराम सुरनर, एल.आर. लिंगापुरे, आर.जी. जाधव, डॉ. श्रीराम राठोड, सतीशचंद्र शिंदे, डी.बी. कळसकर, डी.के. पाटील, दिगांबर गिरी, साहेबराव बेळे, सुनील डोईजड, सौरभ येईलवाड, रामेश्वर गोडसे, नंदकुमार कोसबतवार, बी.के. कोटेकल्लुरकर दत्ता चापलकर, बालाजी कोंडलवाडेसह आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!