उमरी रेडिमेड कपड्यांच्या जमान्यात उसवले आयुष्याचे धागे!!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

कपडे शिऊन घेण्याकडे तरुणाईची पाठ टेलर व्यावसायिक आर्थिक अडचणीत व्यावसायिक

उमरी तालुका प्रतिनिधी उद्धव मामडे

उमरी- सण, घरात मंगलकार्य आले की, नवीन कपडे शिवण्याचा सर्वांचा आग्रह असतो. यासाठी पूर्वी टेलरकडे दीड ते दोन महिने आधी जावे लागत होते. कपड्यांचे माप घेऊन टेलर ग्राहकाला तारीख देत.तयार केलेले कपडे त्या तारखेला जाऊन घ्यावे लागत होते त्यानंतर शुभकार्य, सणाला कपडे घातले जात होते. त्यामुळे टेलर आपल्या व्यवसायात व्यस्त होते.मात्र,सध्या रेडिमेड कपड्याचा जमाना, त्यात ऑनलाइन शॉपिंगची भर पडल्याने टेलरिंग व्यवसाय अडचणीत आल्याची भावना संबंधितांकडून व्यक्त होत आहे.काळानुरूप परिस्थिती बदलली आणि रेडिमेड कपड्याचा जमाना आला.यामुळे रेडिमेड कपड्यांकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. मात्र या रेडिमेड जमान्यात पारंपरिक टेलर व्यवसाय करणारे अडचणीत सापडले आहेत अगदी काही कमी प्रमाणात नागरिक टेलरकडे जाताना आजही दिसत असले तरी तरुणाईने मात्र पूर्णपणे पाठ फिरविली आहे परिणामी पुरुष टेलरची बिकट परिस्थिती आहे.

      एकेकाळी लग्न सराई, दिवाळी, दसरा या काळात टेलरला वेळ मिळत नसे परंतु, काळानुरूप बदल झाला आणि युवा वर्ग रेडिमेडकडे वळला आहे.ऑनलाइनची भर पडली असून टेलर व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे नवा व्यवसाय कोणता करावा असा प्रश्न त्यांना पडला असून इतर व्यवसायाकडे ते वळत आहेत.

    पुरुष टेलर्ससाठी हवी शिलाई मशीनची योजना.एकेकाळी शिवणकाम टेलरिंगच्या व्यवसायाकडे युवकांचा मोठा कल होता. परंतु तो आता बोटावर मोजता येईल इतपत झाला आहे. या व्यवसायापासून युवा पिढी दूर जात असल्याचे दिसून येत आहे. रेडिमेड, ऑनलाइन कपड्यांची घरपोच सेवा अशा विविध कारणांनी टेलरिंगचा व्यवसाय अडचणीत आला आहे. शासनाकडून पुरुष टेलर्स यांनाही शिलाई मशीन देणारी योजना राबविल्यास व्यवसायाला मदतीची ठरणार असल्याची भावना यावेळी,तालुक्यातील टेलर्सवर्गाने व्यक्त केली.

Share This Article
error: Content is protected !!