उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे
उमरी – युवासेनेच्या वतीने मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यासाठी परवानगीची मागणी तहसील कार्यालयात आयोजित शिबिराच निवेदन तहसीलदार साहेबांना यांना देण्यात आला आहे.
साईप्रसाद सुभाष पेरेवार,युवासेनेचा सदस्य यांनी,तालुक्यातील नागरिकांसाठी युवासेनेतर्फे “मतदार नोंदणी शिबिर”आयोजन केला आहे या शिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांना नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात मदत करणे, विद्यमान मतदारांची माहिती अद्ययावत करणे आणि मतदार नोंदणीविषयी जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे.
हा शिबिर युवासेनेच्या नेतृत्वाखाली दिनांक 21 जानेवारी रोजी हनुमान मंदिर हनुमान गल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरा दरम्यान नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, फॉर्म्स भरून घेणे, तसेच कागदपत्रांची पडताळणी यासाठी मदत केली जाईल.
आपण या शिबिरासाठी परवानगी घेऊन, निवडणूक आयोगाशी संबंधित साहित्य, सहाय्यक कर्मचारी, मदत उपलब्ध करून देत असुन हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करीत आहेत.तरी उमरी तालुक्यातील सर्व जनतेनी मतदान पासून वंचित असलेले संबंधितांनी येऊन मतदार नोंदणी जास्ती जास्त लोकांनी नोंद करावा असा आव्हान युवासेना सदस्य साईप्रसाद सुभाष पेरेवार,शशांक पांडुरंग देशमुख , साईनाथ अरगुलवार , गौरव ठाकूर , गणेश गंगासागर यांच्यासह अनेक जण उपस्थितांनी केली आहे.