जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा स्तुत्य उपक्रम
नायगांव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – राज्यात ४ ते १९ जानेवारी या पंधरवड्यात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिर आयोजित करण्यात येत असून त्या अनुषंगाने नायगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात दि.१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिराचा लाभ युवकांनी व भक्तांनी घ्यावा असे आवाहन तालुका सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने राज्यात दि. ४ ते १९ जानेवारी या पंधरवड्यात जवळपास १ हजार काॅप च्या माध्यमातून महारक्तदान महायज्ञाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात १ लाख रक्त बाटल्या संकलनाचे उद्दीष्टये ठेवण्यात आले असून एक लाख बाटल्या महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गोवा व गुजरातला येथील शासकीय मान्यताप्राप्त बल्ड बॅंकेला देण्यात येणार आहे. सामाजिक उपक्रम मार्फत गोरगरीब गरजू पेशंटला हे रक्त पुरवले जाते. त्याचबरोबर देहदान,मोफत अम्बुलेस सेवा, स्वच्छता अभियान असे अनेक सामाजिक उपक्रम जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानाच्या माध्यमातून राज्यात राबविणत येत आहे.
त्यापैकी हा अतिशय महत्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान असून दि.४ ते १४ जानेवारी या दहा दिवसांत ७४७ शिबिरे घेण्यात आले यात ८४ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे
अशी माहिती नांदेड जिल्हा निरीक्षक तथा तेलंगणा पिठाचे पिठ प्रमुख काकासाहेब वनारसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
त्या अनुषंगाने नायगाव शहरातील उप विभागीय ग्रामीण रुग्णालयात दि.१६ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान महायज्ञ शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नायगाव तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष शेषेराव नारसनवाड, सचिव शेषेराव कंधारे,महिला अध्यक्ष गंगाबाई डाके, ज.न.म.प्रर्वचनकर गंगाधर कोकणे,सुधाकर साखरे, ज्ञानेश्वर मोरे, इंगळे, विश्वजित फुलारी,व्यंकटराव पवारे, गोविंद एसके,राजु म्हात्रे, लक्ष्मण पुपलवाड, त्र्यंबक कानगुले,शिवराज पाटील, मारोती शिंदे पळसगाव, सुभाष पेरके सह स्व स्वरूप संप्रदाय तालुका कमिट नायगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.