उमरी ता.प्रतिनीधी /उद्धव मामडे
उमरी : येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती ( युवक दिनी) दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गोदावरी शिक्षण संस्था तळेगाव संचलित गिरीष देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कूल, विद्याभारती ज्यु.कॉलेज उमरी च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. नंदकुमार कुलकर्णी साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विक्रम देशमुख हे होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी अतिशय उत्साहात सर्व समावेशक नृत्य, नाटिका , गीत गायन, भाषणे सादर केली ज्या मध्ये विशेष करून कर्नाटकातील वृक्ष तोड वर कांतरा राजाचे नृत्य , शहीद भगत सिंग नाटिका, छ.संभू राजे नाटिका, T-20 मॅच देखावा, माधुरी गीत,विविध जातीवर वर राज्यावर आधारित गीत धनगर समाज मल्हार गीत, लावणी, शेतकरी नाटिका, भारुड , गणपती गीत,देश भक्ती पर गीत असे अप्रतिम कलेचे अविष्कार सादर केले. यावेळी स्व. शिवाजीराव देशमुख तळेगावकर, स्व.राजेश देशमुख तळेगावकर यांच्या स्मरणार्थ बोथी येथील कु.आकांक्षा आडपोड अर्थ शास्त्र विषयात स्वा.रा. ती.विद्यापीठातून सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थिनी, सिंधी येथील दंगल गर्ल कु.प्रणाली विठ्ठल पुयेड राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत मजल मारलेली विद्यार्थिनी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच संस्थेच्या तळेगाव येथील गोरठेकर मा. वि.ची विद्यार्थिनी कु.रिमशा शेख, कु.मासिरा पठाण लांब उडी मध्ये राज्य स्तरावर मजल मारलेल्या विद्यार्थ्यानी , बोरजुनी येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष डोईफोडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नायगाव येथील पुष्पा 2 फेम राम पा.पळसगावकर हे मुख्य आकर्षण होते.तालुक्यातील मा.उपसभापती पल्लवीताई शिरीष देशमुख गोरठेकर,संस्था सचिव प्रतिनिधी सुनंदाबाई देशमुख,ज्योती देशमुख,गायत्री देशमुख,तळेगाव से. स.चेअरमन सतीश देशमुख,शंकर देशमुख,लक्ष्मीकांत देशमुख,रा. काँ.पार्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम,गणेश पा.जाधव,बालाजी पा.पवार,रामू रेड्डी,आनंदा कपावार, शेख नवाज, मुजमील बेग, राजेंद्र शिंदे,हावगिर पा.होनशेटे, बी. व्ही. चव्हाण, नारायण येमेवार,उध्दव मामडे, मु.अ.एस.एन.सुरकुटवार, मु.अ.एस.आर.हिवराळे सर आदी मान्य वर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती वचेवार मॅडम यांनी केले.सर्व विद्यार्थ्यांचा तयारी नांदेड येथील सुप्रसिध्द डान्सर रॉकी बोलते फेम वाजीद सर , रोहित सर यांनी केले.
कार्यक्रमात शेवटी शाळेच्या सर्व वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन इ.10 वी च्या विद्यार्थीनींनी केले.