नांदेडमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला…..

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

महाराष्ट्र हा बिहार होत चाललेला मार्गावर…?

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – दि.१४.काय हाल झालेत सामान्य जनतेचा लोकशाहीचा तसेच काम करून देखील त्याचा मोबदला न देता अशा न्याय मागणाऱ्या तसेच आपले बिल अडकून ठेवले त्याच्या विरोधात आपले हक्क मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या च्या विरोधात उठणाऱ्या आंदोलकांवर जीवघेणा हल्ला होत असेल मग कायदा सुव्यवस्था या गोष्टी फक्त कागदो पत्रित होत आहे असं निष्पन्न होत आहे. कारण की आपल्या हक्काचे पैसे मागणाऱ्या किंवा आपल्या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा होत असलेल्या भ्रष्टाचाराचा विरोधात होणाऱ्या बोगस कामाविरोधात आवाज उठून ते सर्व समोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आरटीआय कार्यकर्ते व या लोकसळणीत सामील असणाऱ्या त्या सर्व आंदोलकांवर जीवघेंना हल्ले हे योग्य आहेत का जर कायदा सुव्यवस्था योग्यरीत्या चालत असेल तर मग अशा पद्धतीचे गुन्हे कस काय होत आहेत आंदोलकांना जीव मारण्याचे अटकारस्थान हे आजकाल वाढत चाललेले आहे.

कारण की लाचखोर भ्रष्टाचारी टक्केवारी घेणारे काही अधिकारी कर्मचारी व त्यांच्यासोबत काय गुंड प्रवृत्तीचे लोक सोबत ठेवून मोठे मोठे भ्रष्टाचार बोगस कामी व गैरप्रकार करण्यात अवल अशा अनेक विभागात असणारे संबंधित लोकसेवक यांच्या विरोधात का तक्रार करून सुद्धा जर कठोर कारवाई होत नसेल तर मग दुर्दैवाची गोष्ट आहे.

यासाठी राज्य सरकारने आशा होत असलेल्या घटनांचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्राचा बिहार उत्तर प्रदेश होऊ नये याकडे लक्ष द्यावे व कठोर कारवाई करावी…

Share This Article
error: Content is protected !!