उमरी अज्ञात वाहनाने मोटारसायकलला उडविले?दोघेजण ठार

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनीधी:उद्धव मामडे

उमरी – उमरीहून हुंडा तांडा येथे जात असलेल्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघेही ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री
७.३० वाजताच्या सुमारास हिरडगाव
पाटीजवळ घडली आहे.
उमरीहून हुंडा तांडाकडे मोटरसायकलवर विठ्ठल मोतीराम राठोड(५५) व अरविंद सुभाष जाधव (३०) हे दोघे मोटरसायकलवरून जात असताना हिरडगाव पाटीजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या घटनेत विठ्ठल राठोड यांना उमरी येथील
ग्रामीण रुग्णालयात आणले असता
त्यास मृत घोषित करण्यात आले तर
अरविंद जाधव यास नांदेडला घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या दोघांनाही उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. दिव्या भारती यांनी तपासणी करून
दोघेही मृत पावल्याचे घोषित केले.
घटना घडताच पोलीस निरीक्षक अंकुश माने व सहकाऱ्यांनी तात्काळ
घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा
पंचनामा केला.

Share This Article
error: Content is protected !!