माहूर ता.प्रतिनिधी /पंडित धुप्पे
माहूर – वानोळा येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन माहूर चे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माहूरचे गटशिक्षण अधिकारी कृष्णा भराडिया, सरपंच सुनीता सिडाम, उपसरपंच अभिजीत राठोड, सदस्य सुदाम चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी राठोड, उपाध्यक्षा किरण सावन राठोड, माजी प्राचार्य जाधव, गोविंद चव्हाण, सुभाष राठोड, श्री आत्राम साहेब ,पत्रकार पंडित धुप्पे, मुख्याध्यापक पोतुलवार, राजेंद्र चारोडे ,राजकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहूरचे तहसीलदार किशोर यादव व मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वल करून उद्घाटन करण्यात आले. प्रस्ताविक राजेंद्र चारोडे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी खेळातून आपल्या अंगी असलेले कलागुणांना वाव देऊन शारीरिक व बौद्धिक विकास करावा असे मार्गदर्शन करताना तहसीलदार किशोर यादव यांनी आपले विचार व्यक्त केले. या महोत्सवाला वानोळा, वानोळा तांडा, पानोळा ,मुंगशी ,मेंडकी, रामपूर ,मांडवा, वझरा, पाचुंदा, दहेगाव शाळेचे विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग नोंदविला होता. यावेळी शिक्षक केंद्रे, राठोड, संतोष चव्हाण, सोनकांबळे, दुधमल, कोतुलवार, नितीन जाधव, अक्षय राठोड, हर्षल राठोड, विश्वनाथ पवार यासह विविध शाळेचे शिक्षक व शालेय शिक्षण समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले आहे. खेळीमेळीच्या वातावरणात चिमुकल्या मुलांनी आपले अंगी असलेले विविध गुण यावेळी विविध खेळाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखविले यावर उपस्थित गावकरी मंडळी यांनी आनंद व्यक्त केला.