माहूर येथे हिताची कंपनीचे आधुनिक एटीएम केंद्राचे उद्घाटन 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

माहूर ता. प्रतिनिधी/ पंडित धुप्पे

माहूर- येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बाजूला छत्रपती शिवाजी चौकामध्ये हिताची या कंपनीचे आधुनिक एटीएम केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक दिपंकर पाटील, साईनाथ महाराज, विनोद ठाकरे, एस एस पाटील, भाऊ पाटील, एटीएम केंद्राचे केंद्र चालक स्वप्निल तथा सूर्यकांत जाधव, प्रा. विश्वास जाधव, सुधीर जाधव, एडवोकेट शाम गावंडे,समाधान मोरे, सचिन उपासे सर, पत्रकार आमले, बनसोडे, बँकेचे कुमरे सर, विपिन सर, मनीष सर,किरण मॅडम, सुशील काळे, पवन जाधव, कैलास माकोडे, भोजराज राठोड, श्री सुर्वे यांचे प्रमुख उपस्थिती होती, हिताची कंपनीचे आधुनिक एटीएम चे वैशिष्ट्ये असे आहे की यामध्ये एटीएम कार्डचा वापर न करता ही यूपीआय ने रक्कम काढली जाते तसेच कोणत्याही बँकेचे एटीएम ने रक्कम काढता येते व येथे कॅश डिपॉझिट करण्याची आधुनिक सुविधा असल्याचे एटीएम केंद्र चालक स्वप्निल जाधव यांनी सांगितले ही सुविधा माहूर नगरीत प्रथमच चालू झाल्यामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!