जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
परभणी – सध्या राज्यात मागसवर्गीय समाजाच्याच उदरनिर्वाह साठी पूर्वीच्या सरकारनी दिलेल्या जमिनी या शासनाकडून काही तरी या ना त्या योजनेच्या नावाखालीच परत काडून घेण्यात येत आहेत.ही बाब फार गंभीर आहे.त्यांना मागासवर्गीय समाजाला देशोधडीला लावायचा विडाचं या सरकारने घेतला आहे.
परभणी जिल्यातील मौ.बाभळी येथील उखळद शिवारातील गट क्रमांक 24 मध्ये असलेले गायरान हे गावातील बौद्ध समाज 1980 पासून कसत उदरनिर्वाह करत आहेत आणि गायरान नावचे करण्यासाठी वेळोवेळी शासनाला अर्जाच्या माध्यमातून कळवत असून या अर्जाची दखल घेत शासनाने सर्व गायधारकाना अतिक्रमित म्हणून ई सन 1992 ला शासन दरबारी नोंद घेतली.तसेच 1992 मध्ये मौ.बाभळी, उखळद,पिंपरी (दे.) या गावातील बौद्ध समाजाने गाव पातळीवर एक समिती नेमुन सदरील गायराणावर बौद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर स्थापन करण्यासाठी सर्वानुमते ठराव पास केला व त्या ठिकाणी पंचशील ध्वज उभा केला आहे आणि आजतागायत त्या ठिकाणी सर्व महामानवांच्या जयंत्या व सामाजीक उत्सव राबविले जातात..!
परंतु आज महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या ठिकाणी गायरान जमिनी बौद्धांच्या ताब्यात आहेत म्हणजे काही ठिकाणी बौद्ध विहारासाठी,समाज मंदिरासाठी तर काही ठिकाणी उदरनिर्वाहासाठी कसत असलेल्या ठिकाणच्या जमीनीवरच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवून त्या जमिनी ताब्यात घेण्याचे षडयंत्र चालविले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून परभणी तालुक्यातील मौ. बाभळी येथील उखळद शिवारामधील गट क्रमांक 24 मधील गायराणामध्ये बौद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरसाठी गेल्या 40 वर्षापासून बौद्ध समाज शासनाकडे मागणी करत आहे आणि त्याच ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सौर कृषी वाहिनी योजना राबविण्याचे काम ज्या बोडाडा इंजि.प्रा.लीमिटेड कंपनीला देण्यात आले आहे ती कंपनी जाणून बुजून बौद्धांच्या ताब्यातील नियोजित गायराणावरच ही योजना राबविण्यासाठी सदरील कंपनीचे लोक दबाव टाकत आहेत.विशेष म्हणजे सदरील गायराणावर जैन मंदिर, रेणुका माता मंदिर व इतर काही लोकांचे देखील अतिक्रमण असून सदरील कंपनी व महाराष्ट्र सरकार जाणूनबुजून बौद्ध विहार व पंचशील ध्वज जागेवरच डोळा ठेऊन काम करत आहे.
तरी गट क्रमांक 24 मधील बौद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर नियोजीत जागेवर सौर वाहिनी प्रकल्प न उभारता गट क्रमांक 24 मध्ये भरपूर शिल्लक असलेल्या गायरान जमिनीमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी प्रकल्प उभारावा अन्यथा भीमशक्ती सामाजीक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र शासनाच्या व बोडाडा इंजि.प्रा.ली.कंपनीच्या विरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले.
या प्रसंगी भदंत मुदितानंदजी थेरो भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख सतीश भिसे सोबत संजय वाव्हळे,भानुदास उघडे, प्रेमानंद बनसोडे,युवराज कांबळे,चंद्रमुनी उघडे,सतीश उघडे,यशवंत उघडे,भास्कर उघडे,गणपत उघडे,त्र्यंबक उघडे,सिद्धार्थ उघडे,मारोती उघडे,पिराजी उघडे,परमेश्वर उघडे, बालासाहेब उघडे, सिदोधन मस्के,विनोद उघडे , माधव उघडे,उत्तम उघडे, हनुमान उघडे,माणिक उघडे, सिदोधन उघडे,राहुल उघडे, रवी उघडे,लक्ष्मण उघडे,प्रधान सावणे,संतोष सावणे,दौलत उघडे,चंद्रकांत नगराळे,कचरू सावणे, पिराजी जंगले,सोनाजी गवळी,सिदोधन मस्के आदी उपस्थित होते. !