पोलीस मित्र संघटनेतील युवकांची मेहनत वाया जाऊ देणार नाही – जनसंपर्कप्रमुख गजानन भगत

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर/लक्ष्मण भैरेवाड 

नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुक्यातील विरसणी, बोरगडी,दिघी,डोल्हारी,वाधी, जवळगाव, सोनारी, करंजी, पोटा, वडगाव, शिबदरा, दुधड या भागातील मुले, मुली मोठ्या आशेने पोलीस भरतीची तयारी करत आहेत. अशी तयारी करा की मेहनत वाया जाऊ नये, असे मार्गदर्शन गजानन भगत यांनी केले आहे.

पोलिस भरतीची तयारी करणारे तरूण काही शेतकरी कुटुंबातील तर काही मजूर कुटुंबातील आहेत. या सर्व मुलांची पोलीसात भरती होणे, ही एकच आशा आहे. त्यासाठी शासनाने सोनारी फाटा येथे क्रीडा मैदारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवक, युवतींनी

केली आहे. ग्रामिण भागातील तरूण, तरूणी आपल्या माता पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस भरतीची तयारी करित आहेत.परंतु ग्रामिण भागात युवकांना तयारी करण्यासाठी सोयीसुविधा नसल्याने अडचणी येत असल्याची भावना ‘देशोवती ‘जवळ व्यक्त केली. आता खेळाच्या मैदानासाठी देशोवतीनेचे आवाज उठवावा,

अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी व गजानन भगत आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील भाऊ पाटील हे मार्गदर्शन करीत असल्याने त्यांचेही आभार म ानले. गजानन भगत यांनी नांदेड जिल्हा हिमायतनगर, तामसा येथे पोलीस मित्र संघटना टिम तयार केली आहे. सर्व पोलीस मित्र संघटनेचे सदस्य निस्वार्थी सेवा करत असतात यांना पोलीस भरतीमध्ये सामावेश करून त्यांना न्याय मिळावा राज्य शासनाकडून हीच अपेक्षित आहे म्हणाले आहे.

Share This Article
error: Content is protected !!