जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
वर्धा – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संत संप्रदायाच्या माध्यमातून राष्ट्र घडवण्यासाठी, सामाजिक,सांस्कृतिक,जातीय सलोखा कायम अबाधित राहील अशी रचना त्यांनी लिहिलेल्या ग्रामगितेतून समाजाला दिली असून काही असामाजिक तत्व आज जातीय तेढ निर्माण करू पाहत आहे.
अश्या परिस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या शिकवणीची अंमलबजावणी करण्याची आज नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी हनुमान टेकडी,अंतोरा जि.वर्धा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा व मारोती महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी महोत्सवात केले.
यावेळी वर्धा लोकसभा खासदार अमर काळे, अनंत मोहोड,भीमशक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे,मराठवाडा अध्यक्ष संतोष भिंगरे,राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव,विदर्भ अध्यक्ष दिलीप भोजराज, पंकज मेश्राम,विजय मेश्राम, हंसराज मेश्राम,मधुसूदन भटकर,रफीक भाई,नरेंद्र जैन, यांच्यासह अनेक मान्यवर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.