सात आरोपींवर गुन्हा दाखल.पाच आरोपी अटकेत तर दोन आरोपी फरार…
प्रतिनिधी / लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर:-मा.श्री. अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड यांना ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत हिमायतनगरमध्ये अवैध धंद्यांची गोपनिय माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी सदर अवैध धंद्यांवर वर कारवाई करणेबाबत श्रीमती, शफकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांना एक विशेष पथक तयार करून कारवाई करणेकामी आदेशीत आदेशीत केले होते, त्या अनुषंगाने दि.22/01/2025 रोजी श्रीमती. शफकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर व पथक तसेच पोनि/अमोल भगत, हिमायतनगर व असे पथक तयार करून छापा मारून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
या कार्यवाही मध्ये अटक आरोपीचे नाव व पत्ता 1) शेख जिलानी शेख बाबा, 50 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड 2) वसंत अमरसिंग राठोड, 46 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड 3) रोहित वसंत राठोड, 21 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड 4) अक्षय लक्ष्मण राठोड, 23 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड 5) तानाजी सदाशिव सोळंकी, 41 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड हे अटकेत तर फरार आरोपीमध्ये 1) राजू जैयस्वाल, 2) गजानन जाधव आहेत. 1) वसंत अमरसिंग राठोड, 46 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, 2) रोहित वसंत राठोड, 21 वर्ष, 3) अक्षय लक्ष्मण राठोड, 23 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड यांचे वज्रधारी धाबा, हिमायतनगर येथून विदेशी दारूच्या 87 बॉटल्स, कि.अं. 13,920/- रु. व रोख रक्कम 12,150/-रु. अशी एकूण 26,070/- रु. किंमतीची मालमत्ता मिळून आल्याने गु.र.क्र. 13/25, कलम 65(ई) म.दा.अ.1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
2) आरोपी नामे शेख जिलानी शेख बाबा, 50 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड याचे रहाते घरी देशी दारूच्या 28 बॉटल्स, कि. अं. 1,960/- रु., विदेशी दारूच्या 12 बॉटल्स कि.अं.1,920/- रु. तसेच 02 तलवार व 01 खंजर मिळून आल्याने गु.र.क्र.14/25, कलम 65 (ई) म.दा.अ.1949 सह 4,25 भाहका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
3) आरोपी नामे तानाजी सदाशिव सोळंकी, 41 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड याचे टिन पत्र्याचे शेडमध्ये देशी दारूच्या 93 बॉटल्स, कि. अं.6,510/- रु., मिळून आल्याने गु.र.क्र. 15/25, कलम कलम 65 (ई) म.दा.अ.1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हनमुद गुन्ह्यात एकूण 36,460/- रु. ची मालमत्ता, 02 तलवार व 01 खंजर हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली असून मा. वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांची माहिती मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या 8802007938 या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात यावी, अवैध धंद्याची माहिती देणा-या व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
हि संयुक्त कार्यवाही श्री. अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड श्री. खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर श्री. सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड श्रीमती. शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे HC/2565, जंकट, HC/2529, कदम, NPC/2608, मकसूद, PC/2624, बुलबुले, HC/1229, आडे, HC/161, सोनपारखे, DPC/105, हनवते, HC/1692, गुंडेवार, PC/3128, तेलंग, PC/3231, पिंगलवाड, ASI/साखरे, ASI/जाधव, HC/1966, आउलवार,यांनी पार पाडली ..