नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील लेंडी धरणाच्या संदर्भात नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी तेलंगणा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट लेंडी प्रकल्प (धरण) विकासासंदर्भात महाराष्ट्र राज्य व तेलंगणा राज्य यांच्या अंतर्गत करारामुळे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
तेलंगणा राज्याच्या हिश्याच्या शिल्लक रक्कमेच्या मागणी संदर्भात नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेबांनी शिष्टमंडळासह तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री बटी विक्रमा,राज्याचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी व पाटबंधारे विभागाचे सचिव प्रशांत पाटील यांची संयुक्तरीत्या भेट घेऊन तेलंगणा राज्याच्या हिश्याची प्रकल्पग्रस्ताच्या विकासासाठीच्या निधीची मागणी यावेळी करण्यात अली.
यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर,प्रदेश सदस्य श्याम दरक,राजण देशपांडे यासह प्रकल्पग्रस्त गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते .