नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – नायगाव येथील साईभक्त दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी तथा जेष्ठ पत्रकार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी कार्यकारणी सदस्य, नायगाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य पोलीस नागरिक समन्वय समिती प्रदेश जनरल सेक्रेटरी,नायगाव आर्य वैश्य समाजाचे उपाध्यक्ष, गजानन चौधरी यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेवर प्रसिध्दी प्रमुख म्हणून बिनविरोध
निवड झाली आहे.या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे ,ज्येष्ठ पत्रकार दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी गजानन चौधरी यांनी, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे नांदेड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून तसेच सामाजिक ,पत्रकारिता राजकीय क्षेत्रात,विशेष कामगिरी केल्याबद्दल नांदेड येथील वासवी भवन येथे नुकत्याच झालेल्या आर्य वैश्य महासभेच्या त्रैवार्षिक निवड, सर्वसाधारण आम सभेत गजानन चौधरी यांची महाराष्ट्र आर्य वैश्य राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी गजानन चौधरी यांची बिनविरोध निवड महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, कार्याध्यक्ष भानुदासजी वट्टमवार, महासचिव गोविंदरावजी बिडवई, यांनी निवड केली असून या निवडीबद्दल महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार, कार्याध्यक्ष भानुदासजी वट्टमवार महासचिव गोविंदरावजी बिडवई ,उपाध्यक्ष नंदकुमार मडगूलवार, बांधकाम समिती सचिव सदानंद मेडेवार, राज्य कार्यकारणी सदस्य राम पत्तेवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, नायगाव आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सतीश मेडेवार, काशी अन्नपूर्णाचे राज्य उपाध्यक्ष साईनाथ मेडेवार, सामाजिक कार्यकर्ते मारोती कत्तुरवार, प्रदीप देमेवार, रमेश मेडेवार, सूर्यकांत कवटीकवार, चंद्रकांत काउलवार, साईनाथ मेडेवार, साईनाथ वट्टमवार, सचिन चिद्रावार, पवन गादेवार, धनंजय कवटीकवार , मनोज अरगुलवार,बालाजीराव चिंतावार, पत्रकार संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बरगे, सरचिटणीस रघुनाथ सोनकांबळे.पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार, पत्रकार शेषराव कंधारे, तानाजी शेळगावकर, गंगाधर गंगासागरे,शिवाजी पन्नासे, मधुकर जवळे.साहेबराव धसाडे.हनुमंत चंदनकर, पत्रकार अशोक वाघमारे यांच्यासह आर्य समाज बांधव व सर्व पत्रकार यांनी शुभेच्छा दिल्या.