नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव -एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव बाजार तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . कै.अमृतराव पाटील चव्हाण जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे सलग 36 वर्षाची परंपरा कायम राखत भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हाभरातील नामांकित 27 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा विषय मुलींचे शिक्षण काल, आज आणि उद्या असा ठेवण्यात आला होता.या स्पर्धेत प्रथम येण्याचा मान शिवराज प्रकाश मोरे, मिलेनियम पब्लिक स्कूल नायगाव या विद्यार्थ्याने पटकावला तर कु. नौशान अब्दुल बारी शेख,जनता हायस्कूल नायगाव या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला तर अंजली गोपीनाथ मजगे, महर्षी कर्वे विद्यालय डोणगाव या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ बक्षीस पल्लवी रामराव पवार शांतिनिकेतन विद्यालय रुई या विद्यार्थिनींनी पटकावला आहे.स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा. सोळंके व्यंकटेश, जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा , प्रा.चौधरी गोपाळराव , हुतात्मा पानसरे जुनिअर कॉलेज अर्जापुर, प्रा. किनाळकर माधवराव,पोस्ट बेसिक जुनियर कॉलेज मरवाळी तांडा यांनी काम पाहिले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता हाय स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गणेश देवडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे पर्यवेक्षक महादेव सोमवार हे होते. जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, जनता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण,उप मुख्याध्यापक यशवंत चव्हाण,पर्यवेक्षक हनुमंत शिंदे, पर्यवेक्षिका प्रा. सौ.शोभा शिंदे, यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन प्रा. पी. डी. जाधव, प्रा. डॉ.राजेंद्र इंगळे, वसंत माने सर यांनी उत्कृष्टरीत्या केले. जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.नागप्पा डूड्डे प्रा.माधव बावलगावे, प्रा. तिरुपती मेथे, प्रा.माधव जाधव, प्रा.आर. आर. शिंदे, प्रा.गजानन शिंपाळे, सय्यद अयुब,प्रा. संगमेश्वर शिंदे प्रा.ज्ञानेश्वर बैस,श्रीपत ढगे सर ,शेख बाबू सर,सय्यद वसीम सर,शरद कदम सर, प्रा.श्रीधर पाटील, संजय मलमवार, गायकवाड आनंद,शेख हसन, गोवर्धन जाधव, बाळू कदम यांनी प्रयत्न केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बालाजी कासले, वसंत माने सर, शरद जोनकल्ले यांनी केले तर शेवटी आभार प्रा.पी.डी. जाधव बारूळकर यांनी मानले. स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल पालक आणि स्पर्धेचे परीक्षक यांनी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जी.सूर्यवंशी सर व त्यांच्या सर्व स्टाफचे कौतुक केले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व कर्मचारी, विद्यार्थ्यांसह शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.